Afghanistan Taliban: ...तोवर तालिबान काबुलमध्ये घुसणार नव्हता, गनींनी खेळ बिघडवला; माजी राष्ट्राध्यक्ष करझईंचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 08:59 PM2021-12-15T20:59:50+5:302021-12-15T21:00:24+5:30

Story Behind Afghanistan Fall by Hamid Karzai: काही महिन्यांपूर्वी देखील त्यांनी तालिबानींना घुसू दिले नसते तर त्यांनी लुटपाट, उच्छाद मांडला असता असे म्हटले होते. 

Till then Taliban would not have entered Kabul, Former President hamid Karzai's told story of Afghanistan fall | Afghanistan Taliban: ...तोवर तालिबान काबुलमध्ये घुसणार नव्हता, गनींनी खेळ बिघडवला; माजी राष्ट्राध्यक्ष करझईंचा गौप्यस्फोट

Afghanistan Taliban: ...तोवर तालिबान काबुलमध्ये घुसणार नव्हता, गनींनी खेळ बिघडवला; माजी राष्ट्राध्यक्ष करझईंचा गौप्यस्फोट

Next

दहशतवादी संघटना तालिबाननेअफगाणिस्तानवर कब्जा करून आता काही महिने लोटले आहेत. जगाचेही लक्ष आता ओमायक्रॉन व्हेरिअंटकडे वळले आहे. अशातच अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझई यांनी मोठा गौप्यस्फोट करत खाली बसलेला धुरळा पुन्हा उडविण्याचा प्रयत्न केला आहे. एपी या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला आहे. 

अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी पलायन केल्यानंतर त्यांनीच तालिबानला शहरात येण्यासाठी निमंत्रण दिल्याचा दावा करझई यांनी केला आहे. काही महिन्यांपूर्वी देखील त्यांनी तालिबानींना घुसू दिले नसते तर त्यांनी लुटपाट, उच्छाद मांडला असता असे म्हटले होते. 

करझई यांनी सांगितले की, तालिबानला काबुलमध्ये येण्याचे निमंत्रण हे लोकांचे संरक्षण करण्याच्या हेतून देण्यात आले होते. अफगाणिस्तान आणि काबुल दोन्ही संकटात सापडले असते. जे दहशतवादी विचार आजवर देशाला लुटत होते, त्यांनी काबुल व इतर शहरांची दुकानेही लुटली असती. गनींसोबत देशाची सुरक्षा हाती असलेले अधिकारी देखील पळून गेले होते. 

तालिबानला काबुलमध्ये घुसायचे नव्हते....
करझई आणि अब्दुल्ला यांनी गनीसोबत बैठक घेतली. यामध्ये सत्तेत भागीदारीसोबत अन्य 15 मुद्द्यांवर पुढच्याच दिवशी ते दोहाला जाणार होते. तालिबान तोवर काबुलच्या बाहेरील भागात पोहोचले होते. मात्र, जोपर्यंत सरकार आणि तालिबानमध्ये समझोता होत नाही तोवर काबुलमध्ये घुसणार नाही, असा वादा तालिबानी नेत्यांनी कतरमध्ये केला होता, असा दावा करझई यांनी केला आहे. 
मात्र, गनी यांनी देश सोडल्याने सारे वातावरणच बिघडले. दुपारी पावणे तीन वाजता गणी गेल्याचे स्पष्ट झाले. संरक्षण मंत्री, गृह मंत्री आणि काबुलचे पोलीस प्रमुख यांच्याशी संपर्क केला, तेव्हा ते देखील देश सोडून पळाल्याचे समजले. यानंतर तालिबानला मी काबुलचा ताबा घेण्याचे निमंत्रण दिल्याचे करझई म्हणाले.

Web Title: Till then Taliban would not have entered Kabul, Former President hamid Karzai's told story of Afghanistan fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.