‘खर्या’ बातम्यांमुळे पत्रकारांवर हद्दपारीची वेळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 06:15 PM2020-03-30T18:15:35+5:302020-03-30T18:15:51+5:30
देशोदेशीच्या पत्रकारांनी वेळोवेळी अनेकाचं पितळ उघडं पाडलं आहे, अर्थातच त्याची भली मोठी किंमतही पत्रकारांना चुकवावी लागलीे. ‘कोरोना’काळातही तीच परिस्थिती पत्रकारांवर ओढवली आहे.
- लोकमत
कोरोनानं सगळ्यांच्या आयुष्याचीच एकदम उलथापालथ करून टाकली आहे. जगभरातल्या लोकांच्या जगण्यावर जसं अंधारं मळभ दाटून आलं आहे, तसंच त्यांच्या मृत्युनंतरही त्यांना कोणी वाली राहिलेला नाही. कोरोना साथीनं ग्रस्त असलेल्यांच्या आणि मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या रोजच्या रोज गणिती वेगानं वाढते आहे. नेमके किती लोक कोरोनाग्रस्त आहेत, किती मेलेत आणि किती मृत्युशय्येवर आहेत, याचा काही अंदाजच लावता येत नाहीये. चीन, रशिया, त्याचप्रमाणे इतरही काही देशांनी कोरोनानं मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या दडवली असे उघड आक्षेप आताच जगभर घेतले जाऊ लागले आहेत.
रुग्णांना वाचवण्यासाठी जगभरातले डॉक्टर जसे जीवावर उदार होऊन रुग्णसेवा करताहेत, तसेच जगभरातले पत्रकारही आपल्या प्राणांची बाजी लावून कोरोनाबाबतच्या खर्या बातम्या जगाला कळाव्यात यासाठी प्रय}ांची पराकाष्ठा करीत आहेत.
देशोदेशीच्या पत्रकारांनी वेळोवेळी अनेकाचं पितळ उघडं पाडलं आहे, अर्थातच त्याची भली मोठी किंमतही पत्रकारांना चुकवावी लागलीे. ‘कोरोना’काळातही तीच परिस्थिती पत्रकारांवर ओढवली आहे.
‘कोरोना’बाबतच्या खर्या बातम्या दिल्यामुळे आणि सरकारांची बदमाषी उघड केल्यामुळे मोठय़ा संकटांचा सामना त्यांना करावा लागतो आहे. त्यांच्या जीवाला तर धोका आहेच, पण त्या त्या देशांतून हद्दपारीची वेळही त्यांच्यावर आलीय.
त्यातलंच एक नाव म्हणजे रुथ मिचेलसन ही इजिप्तची महिला पत्रकार. या परदेशी पत्रकाराला इजिप्त सरकारनं नुकतंच आपल्या देशातून हाकलून दिलं.
काही दिवसांपूर्वीच तथ्थ्यांवर आधारित एक न्यूज रिपोर्ट तिनं तयार केला. कोरोनाच्या काळात झालेली विमान उड्डाणं, प्रवाशांचा डेटा, कोरोनबाधितांचा दर, तज्ञांशी, डॉक्टरांशी बोलून केलेली खातरजमा. या सगळ्या माहितीच्या आधारे तिनं दावा केला की, इजिप्त सरकार कोरोनाबाधितांचा जो आकडा सांगतंय, त्यापेक्षा तो कितीतरी जास्त आहे! मार्चच्या पहिल्या आठवड्यात इजिप्त सरकार आपल्या देशातील कोरोनाबाधितांची संख्या तीन आहे, असं सांगत असताना प्रत्यक्षात ती किमान सहा हजार ते कमाल 19,310 इतकी होती असा दावा तिनं केला. तिचा हा रिपोर्ट प्रसिद्ध होताक्षणी इजिप्त सरकारनं तिला देश सोडण्याचा हुकुम दिला. तिची माहिती खोटी, अफवा पसरवणारी असल्याचा आरोप ठेवत तिचा व्हिसा रद्द केला. पत्रकार म्हणून तिची मान्यताही रद्द केली. ‘माझा रिपोर्ट सत्य असल्याचा’ तिचा दावा सिद्ध करण्याची संधीही तिला दिली गेली नाही. ‘सेन्सॉरशिप’च्या नावाखाली स्थानिक मिडीयाचा गळाही इजिप्त सरकारनं कधीच आवळला आहे. पत्रकारांच्या हक्कांचं संरक्षण करणार्या समितीचं तर म्हणणं आहे, इजिप्त सरकारनं केवळ गेल्या वर्षातच तब्बल 26 पत्रकारांना तुरुंगात टाकलं आहे. दहशतवाद आणि खोट्या बातम्यांचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. 2014 पासून मिचेल इजिप्तमध्ये राहते आहे. ती मुळची लंडनची. 2010पासून आपल्या पत्रकारितेच्या कारकीर्दीची सुरुवात तिनं र्जमनीत; बर्लिन येथून सुरू केली. त्यानंतर वेस्ट बॅँक, गाझा पट्टी, निर्वासित, सिरीया युद्ध. अशा अनेक ज्वलंत प्रo्नांवर जीन धोक्यात घालून तिनं बातमीदारी केली. अनेकांचं म्हणणं आहे, तिचं नशीब थोर, म्हणून तिला किमान इजिप्तमधून बाहेर तरी पडता आलं. नाहीतर..