ऊर्जा बचतीसाठी बदलला टाईम झोन
By admin | Published: April 15, 2016 06:02 PM2016-04-15T18:02:51+5:302016-04-15T18:02:51+5:30
जलविद्युत प्रकल्पांमधील झपाट्याने घटणारी पाण्याची पातळी आणि देशावरील ऊर्जासंकटातून मार्ग काढण्यासाठी व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मडुरो यांनी देशाचा टाइम झोनच बदलण्याचे निश्चित केले आहे.
ऑनलाइन लोकमत
कॅराकास, दि. १५ - जलविद्युत प्रकल्पांमधील झपाट्याने घटणारी पाण्याची पातळी आणि देशावरील ऊर्जासंकटातून मार्ग काढण्यासाठी व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मडुरो यांनी देशाचा टाइम झोनच बदलण्याचे निश्चित केले आहे. याबरोबरच सार्वजनिक क्षेत्रासाठी सोमवारी सुटी देण्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.
व्हेनेझुएला सध्या दुष्काळाचा सामना करत आहे, त्यामुळे जलविद्युत प्रकल्पांमधून निर्माण होणारी ऊर्जा पाण्याच्या साठ्यावरच अवलंबून आहे. त्यामुळे वीज बचत होण्यासाठी निकोलस मडुरो नवनवीन कल्पना अमलात आणत आहेत.नेझुएलाच्या जलविद्युत प्रकल्पात सध्या २४३ मीटर्स इतक्या पातळीपर्यंत पाणी शिल्लक आहे ते २४० मीटर्स पर्यंत गेले तर ऊर्जा बचतीसाठी अधिक कडक पावले उचलावी लागतील. ही परिस्थिती अधिक गंभीर झाल्यास विजेचे रेशनिंगही करावे लागणार आहे.
व्हेनेझुएलाचा टाईम झोन सध्या ग्रीनिच प्रमाणवेळेपेक्षा साडेचार तासांनी मागे आहे. मडुरो यांनी टाइम झोन मागे घेणार की पुढे ते अजून स्पष्ट केलेले नाही. २००७ साली ह्युगो चावेझ यांनी ३० मिनिटांनी टाइम झोन मागे घेतला होता. आता पुन्हा टाइम झोन बदलल्यानंतर कार्यालयीन कामकाज दिवसाउजेडी जास्त होईल व त्यायोगे ऊर्जेची बचत होईल, असा बदल करावा लागेल.