वेळ संपली, आता जमिनीवरून हल्ले; इस्रायल गाझावर तिन्ही बाजूंनी हल्ले करण्याच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 06:07 AM2023-10-16T06:07:07+5:302023-10-16T06:07:19+5:30
जारो रणगाडेही शहराकडे कूच करण्यासाठी तयार आहेत. दरम्यान, लेबनॉनमधून इस्रायलच्या हद्दीत ९ रॉकेट डागण्यात आले.
जेरुसलेम : इस्रायल-हमास युद्धाच्या नवव्या दिवशी इस्रायलने गाझामधील १० लाख नागरिकांना उत्तर गाझा शहर रिकामे करण्यासाठी दिलेली तीन तासांची मुदत संपली आहे. आता इस्रायलचे सैनिक तिन्ही बाजूंनी (जमीन, समुद्र आणि आकाश) हल्ल्यासाठी तयार आहेत. हजारो रणगाडेही शहराकडे कूच करण्यासाठी तयार आहेत. दरम्यान, लेबनॉनमधून इस्रायलच्या हद्दीत ९ रॉकेट डागण्यात आले.
चौथे विमान भारतात
इस्रायलमधून २७४ भारतीय नागरिकांची चौथी तुकडी विशेष विमानाने मायदेशी रवाना झाली.
जबरदस्तीने खोलीत नेत केली कत्तल
nहमासने निर्दयीपणे केलेल्या हल्ल्याची माहिती समोर येत आहे. खोल्यांमध्ये लपलेल्या महिला, मुले आणि वृद्धांना हमासने गोळ्या घालून ठार केले.
nघरे जळून टाकली. मुलांना बांधले तर काहींना जबरदस्तीने एका खोलीत नेले आणि त्यांची कत्तल केली, असे इस्रायच्या नागरिकांनी सांगितले.