युनोच्या दक्षिण सुदानमधील मोहिमेचे तिनईकर फोर्स कमांडर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 04:49 AM2019-05-26T04:49:33+5:302019-05-26T04:50:20+5:30

संयुक्त राष्ट्रांच्या दक्षिण सुदानमधील मोहिमेच्या नव्या फोर्स कमांडरपदी भारतीय लष्करातील सन्मानीत अधिकारी लेफ्टनंट जनरल शैलेश तिनईकर (५७) यांची संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेज यांनी नियुक्ती केली.

Tinikar Force Commander of the campaign in South Sudan, South Korea | युनोच्या दक्षिण सुदानमधील मोहिमेचे तिनईकर फोर्स कमांडर

युनोच्या दक्षिण सुदानमधील मोहिमेचे तिनईकर फोर्स कमांडर

Next

संयुक्त राष्ट्रे : संयुक्त राष्ट्रांच्या दक्षिण सुदानमधील मोहिमेच्या नव्या फोर्स कमांडरपदी भारतीय लष्करातील सन्मानीत अधिकारी लेफ्टनंट जनरल शैलेश तिनईकर (५७) यांची संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेज यांनी नियुक्ती केली.
लेफ्टनंट जनरल फँ्रक कामन्झी (रवांडा) यांची फोर्स कमांडरपदाची मुदत २६ मे रोजी संपत असल्यामुळे शैलेश तिनईकर यांची नियुक्ती झाली आहे. तिनईकरांच्या नियुक्तीची घोषणा युनोने शुक्रवारी केली. तिनईकर यांना भारतीय सशस्त्र दलांत ३४ वर्षांच्या उल्लेखनीय कामगिरीचा अनुभव आहे, असे युनोच्या प्रवक्त्याने निवेदनात म्हटले.
तिनईकर १९८३ मध्ये इंडियन मिलिटरी अकॅडमीतून पदवीधर झाले व सध्या ते जुलै २०१८ पासून इन्फन्ट्री स्कूलमध्ये कमांडंट आहेत. या आधी त्यांनी २०१७ ते २०१८ दरम्यान लष्कराच्या मुख्यालयात लष्करी कारवायांचे अतिरिक्त महासंचालक म्हणून काम केले आहे. त्यांनी डिव्हीजनचे, रिक्रूट ट्रेनिंग सेंटर आणि ब्रिगेडचे नेतृत्व केलेले आहे. उल्लेखनीय सेवेबद्दल तिनईकर यांना सेना पदक आणि विशिष्ट सेवा पदकाने सन्मानीत केले गेले आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या अँगोला व्हेरिफिकेशन मिशन-३मध्ये तिनईकर यांनी १९९६-१९९७ आणि २००८-२००९ मध्ये सुदानमध्ये युनोच्या मोहिमेत काम केले आहे. तिनईकर यांनी डिफेन्स आणि स्ट्रॅटेजिक स्टडीजमध्ये मद्रास विद्यापीठातून मास्टर आॅफ फिलॉसॉफी (एमफील) प्राप्त केली आहे.
संयु्क्त राष्ट्रांच्या वेगवेगळ््या देशांतील शांतता मोहिमांत चौथ्या क्रमांकाचा सर्वात जास्त संख्येने गणवेशातील मनुष्यबळ पुरवणारा भारत देश आहे.

Web Title: Tinikar Force Commander of the campaign in South Sudan, South Korea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.