Video: अबब! 160 फूट उंच विजेच्या खांबावर कामगार चक्क झोपी गेले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 04:34 PM2019-04-15T16:34:58+5:302019-04-15T16:36:02+5:30
१६० फूट उंचीवर हे कामगार मजूर छोट्या छोट्या स्टीलच्या रॉडवर झोपल्याचं या व्हिडीओमधून दिसतंय. या कामगारांच्या सुरक्षेसाठी सर्व उपकरण दिली आहेत.
बीजिंग - झोपेचा खरा आनंद तोच घेऊ शकतो जो दिवसभर केलेल्या कामातून थकलेला असेल. जेव्हा आपल्या डोळ्यावर झोप येते तेव्हा माणूस घरी असो, ट्रेनमध्ये असो किंवा ऑफिसमध्ये असो एक डुलकी लागतेच लागते. या सर्वांचं मोठं उदाहरण झालंय सोशल मिडीयावर व्हायरल होणारा व्हिडीओ.. ज्यामध्ये एका चीनच्या कामगारांचा समुह जीवाची कोणतीही पर्वा न करता जमिनीपासून १६० फूट उंच असणा-या विजेच्या खांबावर झोपी गेलेत.
या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, १६० फूट उंचीवर हे कामगार मजूर छोट्या छोट्या स्टीलच्या रॉडवर झोपल्याचं या व्हिडीओमधून दिसतंय. या कामगारांच्या सुरक्षेसाठी सर्व उपकरण दिली आहेत. हा व्हिडीओ शुक्रवारी शिआओ जियांग नावाच्या सोशल मिडीया अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ हूनान प्रांतातील चेनझोऊ शहराचा असल्याचं सांगितलं जातं आहे.
जियांगच्या वृत्तानुसार हे चीनचे कामगार वीजेचं काम करण्यासाठी खांबावर चढले होते. काम करताना आलेल्या थकव्यामुळे कामगार १६० फूट उंचीवरचं झोपून गेले. बीजिंग मिडीयाने सांगितले की, शिआओ जियांग आणि त्यांचे कामगार यांचे नेहमीचं काम हेच आहे. विजेच्या खांबावर चढून ते काम करत असतात. आत्तापर्यंत हे कामगार ३२८ फूट उंची असणाऱ्या विजेच्या खांबावर चढून काम केलं आहे. जेव्हा हे कामगार काम करण्यासाठी टॉवरवर चढतात तेव्हा फक्त जेवणाच्या वेळीच ते खाली उतरतात. दिवसभर कामाने थकून कामगार वर्ग कधीकधी वर झोपी जातो. मात्र त्यांच्या सुरक्षेसाठी योग्य त्या खबरदाऱ्या घेतल्याचं दिसून येतं आहे.
हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. ज्या लोकांना नोकरी करणं, काम करणं खूप कठीण काम वाटतं असलं तर त्यांनी एकदा बांधकाम आणि दुरुस्ती क्षेत्रातील कामगारांची अवस्था बघावी. ज्या लोकांना दिवसभर उन्हात काम करावं लागतं, जीव धोक्यात घालून लोकांसाठी काम करत असतात. हा व्हिडीओ पाहून नक्कीच आपल्यापेक्षाही अशी लोकं या जगात आहेत जे थोड्या आरामासाठी आपला जीव धोक्यात घालतात.