...म्हणून तिनं स्वत:शीच बांधली लग्नगाठ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 02:03 PM2018-10-11T14:03:08+5:302018-10-11T14:04:11+5:30
लग्नाचं वय झाल्यानंतर प्रत्येक पालक आपल्या मुलांपुढे लग्नासाठी तगादा लावतात.
लग्नाचं वय झाल्यानंतर प्रत्येक पालक आपल्या मुलांकडे लग्नासाठी तगादा लावतात. अनेकांना आईवडिलांच्या या तगाद्याची कटकट वाटू लागते. परदेशातही असाच एक प्रकार घडला आहे. युगांडामधील एका तरुणीने स्वत:शीच लग्न करुन कुटुंबियांसाठी लग्न हा विषयच बंद केला आहे.
लूलू जेमिमा असं या 35 वर्षीय तरूणीचं नाव असून ती ऑक्सफर्ड विद्यापीठाची विद्यार्थिनी आहे. लग्नाचं वय झाल्यामुळे लूलूचे नातेवाईक तिला वारंवार लग्न करण्याचा सल्ला देत होते. त्यामुळे वैतागलेल्या लूलूने स्वत: शीच लग्न करण्याचा निर्णय घेतला. फोनवर आईला लग्नाची संकल्पना सांगितली. मात्र आई गोंधळलेली होती. तसेच माझ्या वडिलांना अजूनही या लग्नावर कशा पद्धतीने व्यक्त व्हावे हे समजत नसल्याचेही लूलूने सांगितले. डेली मेलने याबाबचे वृत्त दिले आहे.
लूलूने गो फाऊण्ड मी साईटवर लग्नासंबंधीत एक ब्लॉगही लिहिला आहे. या ब्लॉगमध्ये तिने स्वत:शीच लग्न करण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. मी 16 वर्षांची झाले, त्यावेळी माझ्या वडिलांनी माझ्या लग्नसाठीचे भाषण लिहिले. माझ्या प्रत्येक वाढदिवसाला आई माझ्यासाठी प्रार्थना करते. मागील काही वर्षांपासून ती तिच्या प्रार्थनेमध्ये माझ्या मुलीची काळजी घेणारा चांगला नवरा तिला मिळू दे अशी मागणीही देवाकडे करायची. म्हणूनच त्यांची काळजी संपवण्यासाठी मी लग्नाचा निर्णय घेतला आणि माझ्या 32 व्या वाढदिवशी माझी काळजी घेऊ शकणाऱ्या व्यक्तीशी विवाह केल्याचं लूलूने म्हटलं आहे. लूलूच्या लग्नसोहळ्याला तिचे नातेवाईक आणि काही मित्रमंडळीही उपस्थित होती.