पहिल्यांदाच समोर आले टायटॅनिकचे असे फोटो, बघा समुद्रात पडून असलेल्या जहाजाचा अद्भुत नजारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 09:42 AM2023-05-19T09:42:51+5:302023-05-19T09:48:47+5:30
Titanic New Photo : अटलांटिक ओशनच्या बुडाशी पडून असलेल्या या जहाजाचे काही नवीन फोटो समोर आले आहेत. साइंटिस्ट्सने हे फोटो जारी करून लोकांसमोर वेगळा दृष्टीकोन ठेवला.
(Image Credit: SOURCE ATLANTIC PRODUCTIONS/MAGELLAN)
Titanic New Photo : टायटॅनिक जहाज समुद्रात बुडाल्यानंतर त्याची खूप जास्त चर्चा झाली. आजही यावर बोललं, लिहिलं जातं. हे विशाल जहाज मोठ्या जल्लोषात रवाना करण्यात आलं होतं. लोकांमध्ये याबाबत फार उत्साह होता. पण नियतीला वेगळंच मंजूर होतं. हे जहाज ग्लेशिअरला धडकलं आणि महासागरात बुडालं. जहाजातील जास्तीत जास्त प्रवाशांचा थंड पाण्यात पडून मृत्यू झाला होता. जे काही वाचले त्यांना तो भयावह आठवतो. त्यानंतर अनेक एक्सपर्ट्स समुद्रात पडून असलेल्या या जहाजाचे फोटो आणि माहिती गोळा करत आलेत.
अटलांटिक ओशनच्या बुडाशी पडून असलेल्या या जहाजाचे काही नवीन फोटो समोर आले आहेत. साइंटिस्ट्सने हे फोटो जारी करून लोकांसमोर वेगळा दृष्टीकोन ठेवला. पहिल्यांदाच टायटॅनिकच्या पूर्ण मलब्याचे फोटो समोर आले आहेत. असं पहिल्यांदाच झालं आहे की, टायटॅनिकच्या मलब्याला स्कॅन करण्यात आलं आहे. हे जहाज आजही समुद्रात 3800 मीटर खाली पडून आहे. अनेक एक्सपर्ट्सनी याच्या आत जाऊन किंवा कॅमेरा मशीनने याचे फोटो घेतले.
हे फोटो Magellan Ltd जारी केले. ही एक डीप सी मॅपिंग कंपनी आहे. याच्या मदतीसाठी अटलांटिक प्रोडक्शनही समोर आलं जे यावर माहितीपट बनवत आहे. दोघांनी मिळून 2022 मध्ये जहाजाच्या मलब्याची मॅपिंग सुरू केली होती. तशी तर मलब्याबाबत 1985 मध्येच चौकशी सुरू झाली होती. पण नेहमी जहाजाच्या एका भागाला स्कॅन केलं जात होतं. आता पहिल्यांचा पूर्ण मलबा स्कॅन करण्यात आला आहे.
या स्कॅनमध्ये रिमोट कंट्रोल कॅमेराचा वापर करण्यात आला होता. त्यांना साधारण 200 तास मलबा स्कॅन केला. यात दाखवण्यात आलं आहे की, जर समुद्रातील पाणी संपलं किंवा काढलं तर टायटॅनिक कसं दिसेल. या फोटोंच्या माध्यमातून 1972 साली बुडालेल्या या जहाजावर पुन्हा अभ्यास केला जाईल. साइंटिस्ट्सना पूर्ण विश्वास आहे की, यावेळी ते हे जहाज बुडण्याचं खरं कारण नक्की शोधू शकतील.