आजचा दिन लोकशाहीचा, एकजूट होऊ या...; अमेरिकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2021 06:01 AM2021-01-21T06:01:18+5:302021-01-21T06:58:50+5:30

जनतेच्या महत्त्व अधोरेखित करताना बायडेन म्हणाले, अमेरिकेचे ऐक्य आणि जनतेच्या एकजुटीसाठी मी आज जानेवारी या दिनी समर्पित आहे, असे सांगत त्यांनी द्वेष, मत्सर, कट्टरता, कायदाभंग, हिंसाचार, बेरोजगारी, अनारोग्य आणि निराशेविरुद्ध लढा देण्यासाठी एकजूट व्हावे लागेल.

Today is the day of democracy, let's unite ...; New US President Biden's appeal | आजचा दिन लोकशाहीचा, एकजूट होऊ या...; अमेरिकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे आवाहन

आजचा दिन लोकशाहीचा, एकजूट होऊ या...; अमेरिकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे आवाहन

googlenewsNext

वॉशिंग्टन : ‘आजचा दिन अमेरिकेचा, लोकशाहीचा आहे. इतिहास आणि आशेचा दिन. आपण आज एका उमेदवाराचा विजय नव्हे तर एका उद्देशाचा, लोकशाहीच्या उद्देशाचा विजय साजरा करीत आहोत. लोकशाही जिंकली. सर्व अमेरिकी जनतेचा मी राष्ट्राध्यक्ष असेन. श्वेत वर्णीयांच्या वर्चस्ववादाचा आणि देशांतर्गत दहशतवादाला आम्ही पराभूत करू. यासाठी प्रत्येक अमेरिकन व्यक्तीने मला साथ द्यावी, असे आवाहन करीत महाशक्तिशाली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी राष्ट्रीय ऐक्य अबाधित राखण्याची आणि एकजूट होण्याची साद घातली.

जनतेच्या महत्त्व अधोरेखित करताना बायडेन म्हणाले, अमेरिकेचे ऐक्य आणि जनतेच्या एकजुटीसाठी मी आज जानेवारी या दिनी समर्पित आहे, असे सांगत त्यांनी द्वेष, मत्सर, कट्टरता, कायदाभंग, हिंसाचार, बेरोजगारी, अनारोग्य आणि निराशेविरुद्ध लढा देण्यासाठी एकजूट व्हावे लागेल.

आपला इतिहास सातत्याने अमेरिका आदर्शादरम्यान संघर्ष करीत आला आहे. वंशवाद, उपजतवाद, भीती आणि असुरीपणाने आमच्यात दरी निर्माण केली जात आहे. दोन आठवड्यांपूर्वी कॅपिटलमध्ये हिंसक प्रकार घडल्याने शपथविधी समारोहासाठी कडेकोट सुरक्षा करण्यात आली होती. सरन्यायाधीश जॉन रॉबर्टस्‌ यांनी बायडेन यांना राष्ट्राध्यक्षपदाची शपथ दिली. 

बायडेन यांच्या शपथविधीआधी कमला हॅरिस यांचा उपराष्ट्राध्यक्ष म्हणून शपथविधी पार पडला. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश सोनिया सॉटोमायर यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. कमला हॅरिस यांनी अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष म्हणून इतिहास घडविला. त्या पहिल्या कृष्णवर्णीय आणि पहिल्या भारतीय-अमेरिकन उपराष्ट्राध्यक्ष आहेत.

आव्हानांचा यशस्वी मुकाबला -
राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्राला उद्देशून केलेल्या पहिल्याच भाषणात बायडेन म्हणाले की, अमेरिका वारंवार कसोट्यांना सामोरे गेली. सर्व आव्हानांचा यशस्वीपणे मुकाबला करीत अमेरिका वाटचाल करीत आहे. काही शक्ती आमच्यात फूट पाडत आहेत. या शक्ती काही नवीन नाहीत. 
 

Web Title: Today is the day of democracy, let's unite ...; New US President Biden's appeal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.