आज मार्शल आर्ट्सचा अनिभिषिक्त शहेनशहा ब्रूस ली याची पुण्यतिथी

By admin | Published: July 20, 2016 08:35 AM2016-07-20T08:35:00+5:302016-07-20T08:35:00+5:30

ल्या बुक्कीने तो ९० किलोच्या थैलीस हवेत उडवत असे अन साईड किकच्या आधारे छत कोसळवू शकत असे असे अद्भुत कारनामे करणारा तो म्हणजे अर्थातच ब्रूस ली

Today is the death anniversary of Marshall Arts's unconscious Shehnanshu Bruce Lee | आज मार्शल आर्ट्सचा अनिभिषिक्त शहेनशहा ब्रूस ली याची पुण्यतिथी

आज मार्शल आर्ट्सचा अनिभिषिक्त शहेनशहा ब्रूस ली याची पुण्यतिथी

Next
>संजीव वेलणकर पुणे.
जन्म:- २७ नोव्हेंबर १९४०
पुणे, दि. 20 - एखाद्या व्यक्तीने त्याची खुली मुठ बंद करण्यापूर्वीच तो त्याच्या हातातील एक डाईम काढून त्याऐवजी हातातील दुसरे नाणे सरकावू शकत असे इतका त्याच्या हालचालीचा वेग होता, त्याचा हाताच्या खालच्या दिशेने केलेला प्रहार सेकंदाच्या पाचशेव्या भागाइतका गतिमान असायचा, एका हातावरचे ५० चिन अप्स तो मारू शकत असे, तो तांदळाचा दाणा हवेत भिरकावून त्याला हवेतच चॉपस्टिकच्या सहाय्याने तोडत असे, कोका कोलाच्या सीलबंद डब्यात तो आपली बोटे घुसवू शकत असे, सहा इंच जाडीची लाकडी फळी मोडणे त्याचा एका सेकंदाचा खेळ होता, हाताचे अंगठे आणि तर्जनी यावर तो एका मिनिटात ५० डिप्स मारत असे, त्याच्या हालचाली इतक्या वेगवान असत की सेकंदाला  २४ फ्रेम या गतीने त्या चित्रित होऊ शकत नसत म्हणून प्रतिसेकंद ३२ फ्रेम या गतीने त्या चित्रित कराव्या लागत, सीटअपच्या व्ही पोझिशनमध्ये तो ३० मिनिटे बसून राहू शकत असे, आपल्या बुक्कीने तो ९० किलोच्या थैलीस हवेत उडवत असे अन साईड किकच्या आधारे छत कोसळवू शकत असे असे अद्भुत कारनामे करणारा तो म्हणजे अर्थातच ब्रूस ली!! 
 
त्याचं बालपण हाँगकाँगमध्ये गेलं. ब्रूसलीच्या वडिलांनी ब्रूसलीच्या वयाच्या १८ वर्षी हाँगकाँग सोडण्याचा निर्णय घेतला. नाइलाजाने घेतलेला हा निर्णय मात्र ब्रूस लीचं आयुष्यच बदलवणारा ठरला. युनिव्हसिर्टी ऑफ वॉशिंग्टनमध्ये ड्रामा विषयात डिग्रीचं शिक्षण घ्यायला सुरूवात केली. शिक्षणाची गाडी सुरू असतानाच त्याच्यातलं मार्शल आर्ट्स मात्र त्याला स्वस्थ बसू देईना. अमेरिकेतच त्याने मार्शल आर्ट्स शिकवायला सुरूवात केली, तेव्हा त्याचं वय होतं १८. कॉलेज सोडून देऊन त्याने जेम्स यीम ली या स्वत:च्या साथीदाराबरोबर मार्शल आर्ट शिकवण्यावरच लक्ष केंदित केलं. ब्रूसचे वडिल ओपेरा स्टार असल्यामुळे अभिनय त्याच्या रक्तात होताच. १८ व्या वर्षापर्यंत तब्बल २० सिनेमांमध्ये त्याने छोट्या-मोठ्या भूमिका केल्या.
 
अमेरिकेत गेल्यानंतरही त्याने वेगवेगळ्या सीरिअल्स तसेच सिनेमांमध्येही कामं केली होती. रेमण्ड चाव यांनी त्याला 'द बिग बॉस' या सिनेमासाठी करारबद्ध केलं आणि रस्त्यावर मारामारी करणारा ब्रूस ली जगभरातल्या रस्त्यांवर पोस्टर्सच्या माध्यमातून झळकला. त्यानंतर मात्र 'फिस्ट ऑफ प्युरी', 'वे ऑफ द ड्रॅगन' आणि 'एण्टर द ड्रॅगन' (मरणोत्तर) या सिनेमांमधून तो जगभराचा अक्षरश: स्टार झाला. पण हॉलिवुडच्या या विलक्षण स्टारचा जीवनप्रवासही तितक्याच गूढपणे संपला. 'एण्टर द ड्रॅगन'साठी डबिंग करत असतानाच तो जमिनीवर कोसळला आणि तिथेच त्याने जगाचा निरोप घेतला.
 
एण्टर द ड्रॅगन हा १९७३ मधला सर्वोच्च कमाई करणारा चित्रपट ठरला होता. 'ननचक्स' हे शस्त्र लोकप्रिय करण्यात ब्रूस लीचा मोठा वाटा होता. आपल्या सिनेमांमध्ये मारामारी करताना तो या ननचक्सचा वापर हटकून करायचाच. जगातील तमाम रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या चायनिज अभिनेत्याच्या चित्रपटांना चीनमध्ये मात्र प्रदशित होण्यास मज्जाव होता. मात्र त्याच चीनमध्ये नंतर या ब्रूसलीचा तब्बल १९ मीटर उंचीचा पुतळा उभारण्यात आला आहे. मा. ब्रूस ली यांचे २० जुलै १९७३ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे मा. ब्रूस ली यांना आदरांजली. 
 

Web Title: Today is the death anniversary of Marshall Arts's unconscious Shehnanshu Bruce Lee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.