सौदी अरेबियाने आज ४७ दहशतवाद्यांचा केला शिरच्छेद
By admin | Published: January 2, 2016 02:12 PM2016-01-02T14:12:08+5:302016-01-02T14:12:08+5:30
दहशतवादाचा गुन्हा सिद्ध झालेल्या तब्बल ४७ जणांचा आज शनिवारी सौदी अरेबियामध्ये शिरच्छेद करण्यात आला आहे. यामध्ये एका प्रमुख शिया धर्मगुरूचाही समावेश आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
रियाध, दि. २ - दहशतवादाचा गुन्हा सिद्ध झालेल्या तब्बल ४७ जणांचा आज शनिवारी सौदी अरेबियामध्ये शिरच्छेद करण्यात आला आहे. यामध्ये एका प्रमुख शिया धर्मगुरूचाही समावेश आहे. २०११ मध्ये सोदी अरेबियामध्ये राजवटीमध्ये जी जोरदार निदर्शने करण्यात आली, त्यांची मुख्य प्रेरणा निम्र अल निम्र हा शिया धर्मगुरू होता. सुन्नी मुस्लीमांचं प्राबल्य असलेल्या प्रांतात शिया मुस्लीमांवर अन्याय होत असल्याचा दावा त्यांचा होता. या धर्मगुरूंचाही शिरच्छेद करण्यात आला आहे.
अत्यंत कट्टर असा तकफिरी आदर्शवाद अंगीकारणे, दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी होणे आणि गुन्हेगारी कट रचणे असे आरोप सिद्ध झालेल्या ४७ जणांचा शिरच्छेद करण्यात आल्याचे सौदी अरेबियाच्या सरकारने एका पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. २००३ व २००४ मध्ये दहशतवादी हल्ले केलेल्या अल कायदाच्या दहशतवाद्यांचाही आज शिरच्छेद केलेल्यांमध्ये समावेश आहे. या सगळ्यांमध्ये एक ईजिप्तचा, एक छादचा तर उर्वरीत सगळे सौदी अरेबियाचे नागरिक होते.
गेल्या दोन दशकांधील शिरच्छेद करण्यात आलेली ही सर्वाधिक मोठी घटना असल्याचे मत आंतरराष्ट्रीय निरीक्षकांनी नोंदवले आहे.
निम्र अल निम्र यांच्या शिरच्छेदाचा शिया पंथीयांनी निषेध केला आहे.