आईची छोटी चूक मुलाच्या जीवावर बेतली; अवघ्या ३० सेकंदानंतर झाला चिमुकल्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 08:40 AM2021-12-17T08:40:06+5:302021-12-17T08:43:08+5:30

जर अशाप्रकारे निष्काळजीपणा केला नसता तर आज कदाचित तो मुलगा जिवंत असता असंही पोलिसांनी म्हटलं.

Toddler, 2, dies after choking on piece of banana before bedtime | आईची छोटी चूक मुलाच्या जीवावर बेतली; अवघ्या ३० सेकंदानंतर झाला चिमुकल्याचा मृत्यू

आईची छोटी चूक मुलाच्या जीवावर बेतली; अवघ्या ३० सेकंदानंतर झाला चिमुकल्याचा मृत्यू

googlenewsNext

लहान चिमुकल्यांच्या बाबतीत अनेकदा डॉक्टर त्याच्या आईवडिलांना खबरदारी घेण्यास सांगत असतात. घरात बागडणारी ही मुलं काही ना काही नवनवीन उद्योग करतात. मात्र आई वडिलांनी लक्ष न दिल्यास त्याचे विपरीत परिणाम घडू शकतात हे यूनाइटेड किंगडममध्ये एका घटनेने प्रखरतेने जाणवू लागलं आहे. याठिकाणी जो ह्द्रयद्रावक प्रकार घडला त्यामुळे सगळ्यांनाच विचार करण्यास भाग पाडलं आहे.

यूनाइटेड किंगडमच्या वेल्समध्ये एका २ वर्षीय मुलाच्या गळ्यात केळ अडकल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. डायल जॉन जेम्स ग्रीग नावाच्या मुलाच्या आईने झोपण्यापूर्वी बाळाला दूधाच्या बॉटलऐवजी चुकीने केळ दिले. त्यानंतर जेव्हा ती पुन्हा मुलाकडे आली तेव्हा तिने पाहिले की, मुलाच्या गळ्यात केळ अडकल्याने त्याला श्वास घेण्यास त्रास होत आहे.

नॉर्थ वेल्स लाइव्ह न्यूजनुसार, हे प्रकरण जुलै महिन्यातला आहे. मुलाची आई डेनिएल बटरली हिने सांगितले की, तिने मुलाला दुधाच्या बॉटलऐवजी हातात केळ दिलं होतं आणि ती तिच्या रुममध्ये गेली. अवघ्या ३० सेकंदात ती पुन्हा मुलाकडे आली परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मुलाच्या गळ्यात केळ अडकल्याने त्याला श्वास घेता येत नव्हता. त्यानंतर तिने तात्काळ ९९९ नंबरवर कॉल करुन मदत मागितली. नॉर्थ वेल्स पूर्व आणि मध्यचे वरिष्ठ कोरोनर जॉन गिटिन्स यांनी सांगितले की, जेव्हा ही घटना घडली तेव्हा महिलेचे दाजीही मदतीसाठी त्यांच्याकडे आले होते. मुलाच्या गळ्यात केळ अडकल्याने तो कशारितीने आवाज करत होता हे सांगणंही माझ्यासाठी कठीण आहे. त्याला प्रचंड वेदना होत होत्या. परंतु बिचारा काहीही करू शकत नव्हता. मी त्याला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला असं आई म्हणाली.

तसेच मी माझ्या मुलाच्या गळ्यात अडकलेला केळीचा तुकडा बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होती. परंतु तो बाहेर येण्याऐवजी जास्तच आतमध्ये गेला. त्यामुळे माझा मुलगा जास्त रडायला लागला. तेव्हा माझी बहीण माझ्याकडे आली होती. आम्ही लाखो प्रयत्न केले तरीही मुलाला वाचवू शकलो नाही. काही क्षणातच माझ्या मुलाने अखेरचा श्वास घेतला. मी माझ्या आयुष्यातील ती रात्र कधीच विसरू शकत नाही असं या आईने सांगितले. दरम्यान, मुलाचा मृत्यू हायपोक्सिस कार्डियक अरेस्टमुळे झाला आहे असं डॉक्टरांनी सांगितले. तर पोलिसांनी या प्रकरणात अपघाती मृत्यू नोंद केली. त्याचसोबत जर अशाप्रकारे निष्काळजीपणा केला नसता तर आज कदाचित तो मुलगा जिवंत असता असंही पोलिसांनी म्हटलं.

Web Title: Toddler, 2, dies after choking on piece of banana before bedtime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.