चिमुकला रमलाय किचनमध्ये; जगातल्या सर्वात लहान शेफचा सोशल मीडियावर धुमाकूळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 04:31 PM2020-05-13T16:31:12+5:302020-05-13T16:31:35+5:30
25 फेब्रुवारी 2020 रोजी या अकाउंटवरून कोबेचा पहिला व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला. त्यानंतर आतापर्यंत काही महिन्यातच या अकाऊंटचे तब्बल 4 लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स झाले आहेत.
काही व्यक्ती अशा असतात की काही खास गोष्टी घेऊनच त्या जन्माला आलेल्या असतात. म्हणून अगदी बोलताही येत नाही अशा वयात या व्यक्ती मोठी कामगिरी करतात. अशी अनेक आश्चर्यचकीत करणारी उदाहरणे आपण ऐकतो आणि पाहतो. सध्या लॉकडाऊनमुळे सारेच घरात अडकून पडलेले आहेत. अशात लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सारेच नवनवीन रेसिपी करताना दिसत आहेत. कुकिंग करत आपला वेळ घालवताना जिभेचेही लाड पुरवले जात आहेत.
अशात एका चिमुकल्यानेही त्याच्या कुकिंग व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे. बेबी शेफ सर्च केले तर हाच व्हिडीओ समोर येतो.कोबे असे या चिमुकल्याचे नाव आहे. कोबे कुकिंग करत असल्याचे व्हिडीओ साऱ्यांना पाहाता यावे म्हणून खास ‘कोबे इट्स’ इंस्टाग्राम अकाउंटही बनवले आहे. त्याचे व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहेत.
25 फेब्रुवारी 2020 रोजी या अकाउंटवरून कोबेचा पहिला व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला. त्यानंतर आतापर्यंत काही महिन्यातच या अकाऊंटचे तब्बल 4 लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स झाले आहेत. अल्पावधीतच या बेबी शेफने साऱ्यांची पसंती मिळवली.
हा बेबी शेफ अमेरिकेतील व्हर्जिनियात राहतो. अगदी मोठ्यांप्रमाणे हा चिमुकला किचनमध्ये सगळ्या गोष्टी अगदी सराईतपणे करताना दिसतो. पदार्थ बनवत असताना, त्यात काही कमी जास्त तर नाही ना? या गोष्टीदेखील तो अगदी आवर्जून पाहतो. त्याचे स्मित हास्य आणि चेहऱ्यावरचे हावभाव पाहून मन अगदी प्रसन्न झाल्याच्या कमेंटस त्याच्या व्हिडीओला मिळत असतात. लॉकडाऊनमध्ये हा बेबी शेफ साऱ्यांनाच रिफ्रेश करत आहे.