Tokyo Olympics: पैलवान दीपक पुनियाच्या कोचने मॅच रेफरीवर केला हल्ला, जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 08:27 PM2021-08-06T20:27:31+5:302021-08-06T20:40:56+5:30

Tokyo Olympics: दीपक पुनियाचा परदेशी कोच मोराड गेड्रोववर मॅच रेफरीवर हल्ला करण्याचा आरोप आहे.

Tokyo Olympics: Deepak Poonia's coach attacks referee after losing bronze medal match | Tokyo Olympics: पैलवान दीपक पुनियाच्या कोचने मॅच रेफरीवर केला हल्ला, जाणून घ्या कारण...

Tokyo Olympics: पैलवान दीपक पुनियाच्या कोचने मॅच रेफरीवर केला हल्ला, जाणून घ्या कारण...

googlenewsNext

टोकियो: जापानच्या टोकियोमध्ये ऑलिम्पिकची धुम सुरू आहे. पण, ऑलिम्पिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भारतीय पैलवान दीपक पूनियाचा फ्रीस्टाइल 86 किलो कॅटेगरीत कांस्य पदकासाठी झालेल्या सामन्यात पराभूत झाला. दीपकला सॅन मरिनोच्या माइल्स अमीनने 4-2 च्या फरकानं पराभूत केलं. पण, सामन्यानंतर जे झालं, ते अतिशय धक्कादायक आहे.

दीपक पुनियाच्या पराभवानंतर दीपकचे परदेशी कोच मोराड गेड्रोवने मॅच रेफरीच्या रुममध्ये जाऊन रेफरीवर हल्ला केल्याची घटना घडलीये. या घटनेनंतर आता जागतिक कुस्ती संघटनेने IOC आणि भारतीय कुस्ती महासंघाला याची माहिती दिली. या कृत्यानंतर कोच मोराड गेड्रोववर कारवाई करत त्यांना माफी मागण्यास सांगण्यात आले. माफी मागितल्यानंतर त्यांना इशारा देऊन सोडले. पण, त्यांना ऑलिम्पिक गाव सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, भारतीय कुस्ती महासंघानं गेड्रोवला टर्मिनेट केल्याची माहिती मिळाली आहे. यापूर्वीही, गेड्रोवने 2004 च्या एथेंस ओलिम्पिकच्या क्वार्टर फायनलमध्ये पराभवानंतर आपल्या प्रतिस्पर्धीवर हल्ला केला होता.

कांस्यसाठी झालेल्या सामन्यात दीपकचा पराभव
दीपक पुनियाला बुधवारी झालेल्या सेमीफायनल सामन्यात अमेरिकेच्या डेविड टेलरकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर दीपक कांस्य पदक जिंकेल, अशी सर्वांना आशा होती. पण, दीपकसह संपूर्ण देशाची कांस्य पदकाची आशाही तुटली. सॅन मरिनोच्या माइल्स अमीनने त्याल 4-2 अशा फरकारनं पराभूत केलं.

Web Title: Tokyo Olympics: Deepak Poonia's coach attacks referee after losing bronze medal match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.