सरकार वाचवण्यासाठी असद यांनी रशियाला दिले २५० मिलियन डॉलर्स, रिपोर्टमधून मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 15:30 IST2024-12-17T15:27:11+5:302024-12-17T15:30:11+5:30

Bashar Al Assad : रशियाने सीरियात बशर अल असद यांची मदत फक्त लष्करी आणि सामरिक तळांसाठी केली नव्हती. तर असद सरकारने त्यासाठी मोठी रक्कमही दिली होती.

Toppled ousted Syrian President Bashar Al Assad flew $250 million in cash to Moscow: Report | सरकार वाचवण्यासाठी असद यांनी रशियाला दिले २५० मिलियन डॉलर्स, रिपोर्टमधून मोठा खुलासा

सरकार वाचवण्यासाठी असद यांनी रशियाला दिले २५० मिलियन डॉलर्स, रिपोर्टमधून मोठा खुलासा

सीरियाची राजधानी दमास्कसमध्ये बंडखोरांनी राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांची सत्ता उलथवून लावली. या घटनेला जवळपास १० दिवस उलटले आहेत. यादरम्यान एक मोठा खुलासा समोर आला आहे. रशियानेसीरियात बशर अल असद यांची मदत फक्त लष्करी आणि सामरिक तळांसाठी केली नव्हती. तर असद सरकारने त्यासाठी मोठी रक्कमही दिली होती.

फायनान्शियल टाईम्सच्या रिपोर्टनुसार, असद सरकारने अंतर्गत युद्धादरम्यान २०१८ आणि २०१९ दरम्यान जवळपास २५० मिलियन डॉलर (सुमारे २१२० कोटी रुपये) रोख मॉस्कोला ट्रान्सफर केले होते. ही रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी डॉलर्स आणि युरोचा वापर करण्यात आला, तर या काळात सीरिया स्वतःच परकीय चलनाच्या संकटाचा सामना करत होता. तसेच, रेकॉर्ड्सवरून समजते की, सीरियन सेंट्रल बँकेने मॉस्कोच्या वनुकोवो विमानतळावर फ्लाइटद्वारे दोन टन रोकड घेऊन जाण्याची सोय केली होती.

रोख निधी रशियाच्या रशियन फायनान्शियल कॉर्पोरेशन बँक (RFK) मध्ये जमा करण्यात आला. रशियन फायनान्शियल कॉर्पोरेशन बँक ही एक कर्ज देणारी बँक आहे. या बँकेचे नियंत्रण सरकारी शस्त्रास्त्र निर्यात कंपनी रोसोबोरोनएक्सपोर्टकडे आहे. रिपोर्टनुसार, हे रोख हस्तांतरण अशावेळी करण्यात आले आहे, जेव्हा सीरियातील बशर अल असद यांचे सरकार पूर्णपणे रशियाच्या लष्करी मदतीवर अवलंबून होते.

२१ फ्लाइट्समधून २५० मिलियन डॉलर्स दिले
असद सरकारने रोख रक्कम घेऊन अनेक फ्लाइट्स रशियाला पाठवल्या होत्या. उदाहरणार्थ, १३ मे २०१९ रोजी एक फ्लाइट १० मिलियन डॉलर्स (जवळपास ८ कोटी) रोख घेऊन मॉस्कोला पोहोचली होती. तर फेब्रुवारी २०१९ मध्ये, सीरियन सेंट्रल बँकेने २० मिलियन युरो (जवळपास १७८ कोटी रुपये) मॉस्कोला विमानाने पाठवले. मार्च २०१८ ते सप्टेंबर २०१९ दरम्यान, एकूण २५० मिलियन डॉलर (जवळपास २१२० कोटी रुपये) २१ फ्लाइट्सद्वारे पाठवण्यात आले. 

रशियन कागदपत्रांवर आधारित मोठा खुलासा
फायनान्शिअल टाईम्सने काही रशियन कागदपत्रे मिळविल्यानुसार, या काळात सीरियातून रशियाला सातत्याने निर्यात होत होती. यात काही गुप्त कागदपत्रांची शिपमेंट, सीरियन सरकारी मुद्रण कंपनी Goznak ने छापलेल्या नवीन सीरियन बँक नोटा आणि सीरियन सैन्यासाठी लष्करी घटक बदलण्याशी संबंधित मालाचा समावेश आहे.

Web Title: Toppled ousted Syrian President Bashar Al Assad flew $250 million in cash to Moscow: Report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.