इम्रान यांना मोठा दणका; सार्वजनिक पदांवर राहण्यास ५ वर्षे अपात्र
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 10:48 AM2022-10-22T10:48:47+5:302022-10-22T10:49:11+5:30
पाच सदस्यीय खंडपीठाने एकमताने हा निर्णय दिला. मात्र, पंजाबमधील सदस्य या घोषणेसाठी उपस्थित नव्हते. या निर्णयाविरुद्ध ते उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत.
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या सर्वोच्च निवडणूक मंडळाने शुक्रवारी माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा झटका दिला. एका प्रकरणात परदेशी नेत्यांकडून मिळालेल्या भेटवस्तूंच्या विक्रीतून आलेली रक्कम लपवल्याबद्दल त्यांना पाच वर्षांसाठी सार्वजनिक पदावर राहण्यास अपात्र ठरवण्यात आले आहे.
पाकिस्तानचे मुख्य निवडणूक आयुक्त सिकंदर सुलतान रझा यांच्या अध्यक्षतेखालील चार सदस्यीय खंडपीठाने एकमताने दिलेल्या निर्णयानंतर पाकिस्तान तहरीक-ए इन्साफचे अध्यक्ष पाच वर्षांसाठी संसदेचे सदस्य होऊ शकत नाहीत.
पाच सदस्यीय खंडपीठाने एकमताने हा निर्णय दिला. मात्र, पंजाबमधील सदस्य या घोषणेसाठी उपस्थित नव्हते. या निर्णयाविरुद्ध ते उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत.