ज्वालामुखीच्या तोंडाजवळ जाऊन सेल्फी घेत होता पर्यटक, 50 फूट खाली पडला आणि...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 03:58 PM2022-07-14T15:58:12+5:302022-07-14T15:58:46+5:30

फिलिप पॅरोल बाल्टीमोरचा राहणारा आहे. वीकेंडला तो इटलीतील या ज्वालामुखीला पाहण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याचा परिवारही त्याच्यासोबत होता.

Tourist taking dangerous selfie on top of the volcano fell inside crater | ज्वालामुखीच्या तोंडाजवळ जाऊन सेल्फी घेत होता पर्यटक, 50 फूट खाली पडला आणि...

ज्वालामुखीच्या तोंडाजवळ जाऊन सेल्फी घेत होता पर्यटक, 50 फूट खाली पडला आणि...

Next

इटलीच्या माउंट वेसुवियस ज्वालामुखीच्या टॉपवर पोहोचून एका टुरिस्टने सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला होता. पण सेल्फी घेण्याच्या नादात तो ज्वालामुखीच्या तोडांच्या आत जाऊन पडला. सुदैवाने तरीही तो या अपघतातून वाचला. हा ज्वालामुखी इटलीच्या कॅंपानियामध्ये आहे.

फिलिप पॅरोल बाल्टीमोरचा राहणारा आहे. वीकेंडला तो इटलीतील या ज्वालामुखीला पाहण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याचा परिवारही त्याच्यासोबत होता. या घटनेबाबत एनबीसी न्यूजसोबत बोलताना स्थानिक गाइडच्या संघटनेच्या अध्यक्षांनी सांगितलं की, हा परिवार ज्वालामुखीच्या तोंडाजवळ जाऊन पोहोचला होता. 

जेथून हा परिवार ज्वालामुखीच्या तोंडाजवळ जाऊन पोहोचला तिथे न जाण्याचा बोर्डही लावला होता. काही मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं की, या परिवाराने या बोर्डाकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर हे लोक 4 हजार फूटांपेक्षा जास्त उंचीवरील ज्वालामुखीच्या टॉपवर पोहोचले. तेव्हा फिलिपने सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा फोन हातातून ज्वालामुखीच्या आता पडला. 

त्यानंतर फिलिपने फोन काढण्याचा प्रयत्न केला. पण तो सुद्धा ज्वालामुखीच्या आत जाऊन  पडला. पाओलो कॅप्पेलीने सांगितलं की, तो नशीबवान होता. तो जर अडकला नसता तर ज्वालामुखीच्या आत खाली जाऊन पडला असता. इटलीमधील या ज्वालामुखीचा व्यास 450 मीटर इतका आहे आणि खोली 300 मीटर आहे.

फिलिपच्या पाठीवर जखमांच्या काही खूणा आहेत. तेथील काही गाइड फिलिपच्या मदतीसाठी धावून आले. नंतर फिलिपला स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतलं. फिलिपला कोणत्या आरोपांचा सामना करावा लागेल हे स्पष्ट नाही. हा ज्वालामुखी 1944 पासून निष्क्रिय आहे. यात अखेरचा उद्रेक 1631 मध्ये झाला होता.

Web Title: Tourist taking dangerous selfie on top of the volcano fell inside crater

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.