पाकिस्तानमध्ये ट्रेनचा भीषण अपघात, 6 प्रवाशांचा मृत्यू तर 100 जखमी
By admin | Published: September 15, 2016 09:31 AM2016-09-15T09:31:21+5:302016-09-15T09:31:21+5:30
मुलतानमध्ये ट्रेनचा भीषण अपघात झाला असून सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अपघातात 100 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 15 - मुलतानमध्ये ट्रेनचा भीषण अपघात झाला असून सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अपघातात 100 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. कराचीला जाणा-या आवाम एक्स्पेसची मालगाडीला धडक बसल्याने हा भीषण अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की ट्रेन रुळावरुनच घसरली. ट्रेनमधील चार डबे प्रवाशांनी भरले होते.
मिळालेल्या माहितीनुसार मालगाडीच्या खाली एक व्यक्ती आली होती. त्याचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी ही मालगाडी थांबली होती. त्याचवेळी आवाम एक्स्प्रेस पेशावरहून कराचीच्या दिशेने चालली होती. शेर शहा परिसरातील बुच्छ रेल्वे स्थानकावर आवाम एक्स्प्रेस पोहोचली असता तिने मालगाडीला धडक दिली. या भीषण अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक जखमी आहेत. यामधील 10 जणांची प्रकृती गंभीर आहे.
जखमींनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आहे. अधिका-यांनी मुलतानमधील निश्तार मेडिकल हॉस्पिटल आणि शाहबाज शरिफ हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी जाहीर केली आहे. जखमींना मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज असल्याने रक्तदान करण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.
6 dead, 150 hurt after Karachi-bound Awam Express collided with a freight train near Multan (Pakistan), officials say - Geo News
— ANI (@ANI_news) September 15, 2016