भाजी मंडईतून धावणारी रेल्वे

By Admin | Published: July 11, 2017 01:50 AM2017-07-11T01:50:38+5:302017-07-11T01:50:38+5:30

भाजीमंडईत वा छोट्या रस्त्यांवर मोठे वाहन आले तर सर्व जण त्याला रस्ता करुन देतात

The train running from the Bhaji Mandi | भाजी मंडईतून धावणारी रेल्वे

भाजी मंडईतून धावणारी रेल्वे

googlenewsNext

भाजीमंडईत वा छोट्या रस्त्यांवर मोठे वाहन आले तर सर्व जण त्याला रस्ता करुन देतात. थायलँडच्या या भाजीमंडईतही या वाहनाला असाच रस्ता करुन देतात. पण, त्या वाहनाचे नाव ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. कारण, या भाजीमंडईतून चक्क रेल्वेला रस्ता मोकळा करुन दिला जातो. रेल्वेची वेळ झाली की, भाजीमंडईतील विक्रेत बाजूला सरकतात. आपल्या वस्तू या रुळाच्या बाजूला हटवितात. अनेक छोटे दुकानदार आपले छप्पर आणि तंबूही हटवितात. रेल्वे निघून गेल्यावर पुन्हा ते रेल्वे रुळावर ठाण मांडतात. त्यामुळेच की काय येथील रेल्वे अतिशय हळू म्हणजेच ३० किमी प्रति तास या वेगाने धावते.

Web Title: The train running from the Bhaji Mandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.