युरोपवर हल्ल्यासाठी ४०० दहशतवाद्यांना प्रशिक्षण

By admin | Published: March 25, 2016 01:44 AM2016-03-25T01:44:15+5:302016-03-25T01:44:15+5:30

इसिसने (इस्लामिक स्टेट आॅफ इराक अ‍ॅण्ड सीरिया) युरोपमध्ये घुसून दहशतवादी हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांना खास प्रशिक्षण दिले आहे. युरोपवर हल्ल्यासाठी इसिसने

Training to 400 terrorists to attack Europe | युरोपवर हल्ल्यासाठी ४०० दहशतवाद्यांना प्रशिक्षण

युरोपवर हल्ल्यासाठी ४०० दहशतवाद्यांना प्रशिक्षण

Next

पॅरिस : इसिसने (इस्लामिक स्टेट आॅफ इराक अ‍ॅण्ड सीरिया) युरोपमध्ये घुसून दहशतवादी हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांना खास प्रशिक्षण दिले आहे. युरोपवर हल्ल्यासाठी इसिसने एकूण ४०० दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले आहे. पॅरिस आणि ब्रुसेल्समध्ये झालेले दहशतवाही हल्ले याचाच भाग आहेत. जास्तीतजास्त हानी करता यावी यासाठी दहशतवाद्यांना वेळ, ठिकाण आणि पद्धत निवडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पश्चिम देशांवर हल्ले करण्यासाठी सीरिया, इराकमध्ये दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले गेले असण्याची शक्यता आहे. युरोपिअन आणि इराकच्या गुप्तचर यंत्रणांनी
ही माहिती दिली आहे. पॅरिस हल्ल्यातील म्होरक्याने ९० दहशतवाही युरोपमध्ये घुसल्याची माहिती दिली होती. या दहशतवाद्यांनी छोट्या, मोठ्या प्रमाणात सगळीकडे नुकसान केले. पॅरिस हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार सालेह अब्देसलामला अटक केल्याने मोठे यश मिळाले आहे. मात्र त्याच्या अटकेनंतरही दहशतवाही हल्ले थांबलेले नाहीत. अटक केल्याच्या चार दिवसांतच ब्रसेल्स विमातळावर २ आणि मेट्रो स्थानकात १ असे एकूण ३ बॉम्बस्फोट झाले. या स्फोटात ३४ जण ठार झाले तर, २५० नागरिक जखमी झाले. बेल्जियमने अधिकृतपणे जारी केलेल्या सीसीटीव्हीमध्ये संशयित तीन आत्मघाती हल्लेखोर टर्मिनलमधूल बाहेर पडताना दिसत आहेत. दोन हल्लेखोरांनी स्फोट घडवून आत्महत्या केली असून, एका हल्लेखोराकडील बॉम्ब न फुटल्याने त्याचा कट फसला.

पॅरिस हल्ल्यानंतर अब्देसलाम ब्रुसेल्समधील घरी गेला होता. तिथे त्याने कट रचल्याची माहिती बेल्जिअमच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. पॅरिस हल्ल्यानंतर अब्देसलामने अजून एका हल्ल्याची योजना आखली होती. त्याच्या अटकेमुळे फरक पडत नाही हे दाखविण्यासाठीच हल्ला केल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Training to 400 terrorists to attack Europe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.