नेदरलँडमध्ये वा-यावर धावतायत ट्रेन्स
By admin | Published: January 12, 2017 12:25 PM2017-01-12T12:25:44+5:302017-01-12T12:33:23+5:30
नेदरलँडमध्ये पवनचक्कीच्या माध्यमातून निर्माण करण्यात येणा-या ऊर्जेवर ट्रेन्स धावत आहेत. रोज एकूण सहा लाखांहून जास्त प्रवासी वा-यावर चालणा-या या ट्रेनमधून प्रवास करतात.
Next
ऑनलाइन लोकमत
अॅम्स्टरडॅम, दि. 12 - नेदरलँडमध्ये वा-यावर ट्रेन धावत आहे असं सांगितलं तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. पण विश्वास ठेवा हे खरं आहे. नेदरलँडमध्ये पवनचक्कीच्या माध्यमातून निर्माण करण्यात येणा-या ऊर्जेवर ट्रेन्स धावत आहे. नॅशनल रेल्वे कंपनी एनएसने ही माहिती दिली आहे. 'एक जानेवारीपासून आमच्या 100 ट्रेन्स वा-यावर धावत आहेत', अशी माहिती प्रवक्ता टॉन बून यांनी दिली आहे.
एनएसने दोन वर्षांपूर्वी टेंडर जाहीर केलं होतं. डचमधील इलेक्ट्रिक कंपनी इनेकोने हे टेंडर जिंकलं होतं. यानंतर दोघांमध्ये 10 वर्षांचा करार झाला. यामध्ये सर्व ट्रेन्स वा-यामधील तील ऊर्जेवर चालवण्याचा करार झाला होता, यासाठी जानेवारी 2018 ची सीमारेषा आखण्यात आली होती.
'तसं पाहायला गेल्यास आम्ही एक वर्ष आधीच आमचं ध्येय पुर्ण केलं आहे', असं टॉन बून बोलले आहेत. 'देशभरात वाढणा-या पवनचक्क्या आणि नेदरलँडला लाभलेल्या सागरी किना-यामुळे हे ध्येय वेळेच्या आधी पुर्ण करण्यात यश मिळाल्याचंही', ते बोलले आहेत.
Netherlands take e-mobility to next level: 100% of country’s trains are powered by #wind: https://t.co/U1oDry30llpic.twitter.com/c0vrXxrDZl
— UN Climate Action (@UNFCCC) 10 January 2017
रोज एकूण सहा लाखांहून जास्त प्रवासी वा-यावर चालणा-या या ट्रेन्समधून प्रवास करतात. वा-यातून निर्माण केलेल्या ऊर्जेवर चालणा-या ट्रेनमधून प्रवास करणारे ते पहिले प्रवासी आहेत. अर्धा तास पवनचक्कीच्या माध्यमातून मिळालेल्या ऊर्जेवर ट्रेन किमान 120 किमी अंतर पार करते.