ट्रान्सजेंडर व्यक्तीने दिला बाळाला जन्म
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2017 03:42 PM2017-12-17T15:42:39+5:302017-12-17T15:42:47+5:30
अमेरिकेमध्ये एका ट्रान्सजेंडर व्यक्तीने मुलाला जन्म दिला आहे. जन्म देणारी ट्रान्सजेंडर व्यक्ती आणि मुल सुखरूप आहेत. ही ट्रान्सजेंडर व्यक्ती गेल्या पाच वर्षांपासून महिला म्हणून वावरत असून
वॉशिंग्टन - अमेरिकेमध्ये एका ट्रान्सजेंडर व्यक्तीने मुलाला जन्म दिला आहे. जन्म देणारी ट्रान्सजेंडर व्यक्ती आणि मुल सुखरूप आहेत. ही ट्रान्सजेंडर व्यक्ती गेल्या पाच वर्षांपासून महिला म्हणून वावरत असून, तिचे हे पहिलेच बाळ आहे. विस्कॉन्सिन येथे राहणाऱ्या 30 वर्षीय के.सी. सोलिवन यांच्याकडे महिला आणि पुरुष अश दोन्ही रूपात वावरून बाळाला जन्म देणारी जगातील अशी पहिली व्यक्ती म्हणून पाहिले जात आहे. बाळ सुदृढ असून त्याचं वजन 3 किलो 600ग्रॅम आहे. हे मूल केसीचा जोडीदार स्टीवन (27) याचं आहे. केसी गर्भार राहिल्यानंतर त्याने पुरुष हार्मोन्स घेणे थांबवले होते. सोलिवन यांना त्यांच्या माजी पतीपासून एक मुलगा आहे. जो आता पाच वर्षांचा झाला आहे. ग्रेसन याचा जन्म झाला तेव्हा सोलिवन महिला म्हणून वावरत होते.
केसी आधी महिला म्हणून आयुष्य जगत होती. तिला आधीच्या नवऱ्यापासून एक पाच वर्षांचं मूल आहे. मात्र गेल्या ४ वर्षांपासून केसी पुरुष म्हणून आपल्या जोडीदाराबरोबर राहात आहे. बाळाचं लिंग कोणतं, याचा खुलासा न करण्याचा निर्णय या जोडप्यांनी घेतला आहे. बाळ मोठं झाल्यावर आपल्या लैंगिकतेबाबतचा निर्णय स्वत:च घेईल, असं त्यांचं म्हणणं आहे.
बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतल्यावर लोकांनी या जोडप्यावर सोशल मीडियावरून टीकेचा भडीमार केला होता. पण ते आपल्या निर्णयावर ठाम होते. ट्रान्सपॅरेंटहूडविषयी लोकांचा दृष्टिकोण बदलायला हवा, असं त्यांना वाटतं.