दोन वर्षांत शक्य होणार शिर प्रत्यारोपण
By admin | Published: March 1, 2015 11:54 PM2015-03-01T23:54:33+5:302015-03-01T23:55:03+5:30
वैद्यकीय क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या संशोधनामुळे आयुर्मान वाढण्यासोबत अनेकांना नवजीवन लाभत असून, अवयव दानामुळे अनेकांना
लंडन : वैद्यकीय क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या संशोधनामुळे आयुर्मान वाढण्यासोबत अनेकांना नवजीवन लाभत असून, अवयव दानामुळे अनेकांना जगण्याची नवी उभारी मिळत आहे. हृदय, यकृतासह शारीरिक अवयवांच्या प्रत्यारोपणापाठोपाठ आता मानवी शिराचे प्रत्यारोपणही शक्य होण्याच्या मार्गावर आहे.
इटलीचे शल्यचिकित्सक सर्गियो कॅनाव्हेरो यांनी या अद्भुत शस्त्रक्रियेसाठी विशेष तंत्र विकसित केले आहे. तुरीन अॅडव्हान्स न्युरोमोड्युलेशन ग्रुपचे सर्गियो कॅनाव्हेरो यांनी येत्या दोन वर्षांत शिर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया शक्य असल्याचा छातीठोक दावा केला आहे.
२०१३ मध्ये त्यांनी ही कल्पना मांडली होती. सर्जिकल न्युरोलॉजी इंटरनॅशनल नियतकालिकात त्यांचे हे तंत्र स्पष्ट करणारा एक संशोधनात्मक लेख प्रकाशित झाला होता.
सर्गियो कॅनाव्हेरो यांच्या या तंत्रानुसार दात्याचे शिर आणि गरजूचे शरीर थंड केले जाते. जेणेकरून आॅक्सिजनशिवाय पेशी जीवित ठेवल्या जाऊ शकतात.(वृत्तसंस्था)