खुल्या कॉकपिटच्या विमानातून प्रवास

By admin | Published: January 10, 2016 02:18 AM2016-01-10T02:18:21+5:302016-01-10T02:18:21+5:30

खुल्या कॉकपिटच्या १९४२ बोर्इंग स्टीरमॅन विमानातून ट्रेसी कुर्टिस टेलर (५३) यांनी ब्रिटन ते आॅस्ट्रेलिया हा धाडसी प्रवास यशस्वी केला. तीन महिने लागलेल्या या प्रवासात ट्रेसी कुर्टिस यांना

Travel in an open cockpit plane | खुल्या कॉकपिटच्या विमानातून प्रवास

खुल्या कॉकपिटच्या विमानातून प्रवास

Next

सिडनी : खुल्या कॉकपिटच्या १९४२ बोर्इंग स्टीरमॅन विमानातून ट्रेसी कुर्टिस टेलर (५३) यांनी ब्रिटन ते आॅस्ट्रेलिया हा धाडसी प्रवास यशस्वी केला. तीन महिने लागलेल्या या प्रवासात ट्रेसी कुर्टिस यांना वाईट हवामानासह अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले.
८५ वर्षांपूर्वी म्हणजे १९३० मध्ये इंग्लंड ते आॅस्ट्रेलिया असा ऐतिहासिक हवाई प्रवास करणाऱ्या एमी जॉन्सन यांच्यापासून मी प्रेरणा घेतली होती, असे ट्रेसी यांनी सांगितले. माझा हा प्रवास इतिहासातील महिला पायलटांना श्रद्धांजली आहे. उघड्या कॉकपिटच्या विमानातून प्रवास करतानाच्या अनुभवाबद्दल बोलताना मला एमी जॉन्सन यांना ज्या गोष्टी माहिती झाल्या त्याची मला माहिती घेता आली, असे सांगितले.

२३ देशांवरून प्रवास
सिडनी विमानतळावर त्यांनी वार्ताहरांशी बोलताना उड्डाण खूपच जबरदस्त ठरले असे म्हटले. अशा प्रकारच्या प्रवासात जगाचे वेगळेच रूप, भौगोलिक क्षेत्र, झाडेझुडुपे बघणे खूपच रोमांचकारी आहे, असेही ट्रेसी कुर्टिस म्हणाल्या.
आॅक्टोबर २०१५ मध्ये त्यांचा हा धाडसी प्रवास सुरू झाला. रोज सात ते आठ तासांच्या या प्रवासात त्यांनी १४,६०० नॉटिकल मैल अंतर कापले. २३ देशांवरून त्यांना प्रवास करावा लागला व इंधन भरण्यासाठी ५० ठिकाणी थांबावे लागले.

Web Title: Travel in an open cockpit plane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.