विनाचालक रेल्वे धावली २६ किलोमीटर मागे

By admin | Published: April 13, 2015 04:37 AM2015-04-13T04:37:02+5:302015-04-13T04:37:02+5:30

ना ड्रायव्हर ना गार्ड तरीही रेल्वेने मागच्या दिशेने केला तब्बल २६ किलोमीटरचा प्रवास. ही घटना रविवारी बांगलादेशात घडली.

The traveler's railway runs 26 kilometers away | विनाचालक रेल्वे धावली २६ किलोमीटर मागे

विनाचालक रेल्वे धावली २६ किलोमीटर मागे

Next

ढाका : ना ड्रायव्हर ना गार्ड तरीही रेल्वेने मागच्या दिशेने केला तब्बल २६ किलोमीटरचा प्रवास. ही घटना रविवारी बांगलादेशात घडली.
राजबरही स्टेशन मास्टर कमरुज्जमा यांनी सांगितले की, राजबरहीहून फरीदपूरला जाणारी सहा डब्यांची ही रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभी होती व तीत २३ प्रवासी होते. अचानक इंजिन आॅटोगियरमध्ये गेले व रेल्वे मागच्या दिशेने निघाली. रेल्वेचा ड्रायव्हर चहा पिण्यासाठी खाली उतरला; परंतु त्याने इंजिन बंद केले नव्हते व गाडीत तेव्हा गार्डही नव्हता. तिकीट कलेक्टर अन्वर हुसेन यांनी कसे तरी दोन डब्यातील व्हॅक्यूम ब्रेकच्या पाईपला वेगळे केले व रेल्वे बाबूबाजार पुलावर थांबली, असे ते म्हणाले. नंतर रेल्वेला दुसऱ्या इंजिनाने राजबरही स्टेशनवर आणले. रेल्वेचा ड्रायव्हर व गार्डला तात्पुरते निलंबित केले असून याच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली. (वृत्तसंस्था)

Web Title: The traveler's railway runs 26 kilometers away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.