इकॉनॉमीच्या तिकिटावर बिझनेस क्लासमधून प्रवास, महिलेने केला असा जुगाड, ऐकून व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 11:13 PM2023-06-15T23:13:15+5:302023-06-15T23:14:10+5:30
Airplane: विमानातून प्रवास करणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. ज्यांनी विमानातून प्रवास केला असेल तर त्यांचं बिझनेस क्लासमधून प्रवास करण्याचं स्वप्न असतं. कारण बिझनेस क्लासमधील सीट मोठ्या असतात.
विमानातून प्रवास करणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. ज्यांनी विमानातून प्रवास केला असेल तर त्यांचं बिझनेस क्लासमधून प्रवास करण्याचं स्वप्न असतं. कारण बिझनेस क्लासमधील सीट मोठ्या असतात. त्याबरोबरच या सीटमधील लेग स्पेसही अधिक असते. त्यामुळे प्रवास हा खूप आरामदायी होतो. मात्र बिझनेस क्लासचं तिकीट महाग असतं. जर इकॉनॉमी क्लासचं तिकीट हे ५ हजार रुपये असेल, तर बिझनेस क्लासचं तिकीट हे १० हजार रुपये असतं. त्यामुळे अनेक लोकांना बिझनेस क्लासमधून प्रवास करणे परवडत नाही. त्यामुळे एका महिलेने त्यासाठी एक जुगाड केला, ज्याचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.
ट्विटरवर @TansuYegen या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, एका महिलेने इकॉनॉमी क्लासच्या तीन सीट घेतल्य आहेत. येताच तिने तिन्ही सीटवर प्लॅस्टिक टाकून तात्पुरता बेड बनवला आहे. त्यावर गादीसारखं अंथरूण टाकलं आहे. एक अन्य महिला तिला मदत करत आहे. मात्र या प्रकारावरून एका व्यक्ती तिला विचारतो, तेव्हा ती क्रू मेंबर्सना बोलावून घेते. तेवढ्यात फ्लाइट अटेंडंटची नजर या प्रकारावर पडते. तो हे सर्व काढून फेकून देतो. त्यानंतर बराच वेळ त्यांच्यात चर्चा सुरू असते. आता हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ कुठल्या विमानातील आहे, हे समजू शकलेले नाही. मात्र या व्हिडीओवरून युझर्स तऱ्हेतऱ्हेचे प्रश्न विचारत आहेत. असं कुणी करू शकतो का? मात्र असं, पहिल्यांदा होत नाहीये. २०१९ मध्ये फुकेटमध्ये जाणाऱ्या एका विमानात उड्डाण करणाऱ्या प्रवाशांनी एका बेभान प्रवाशाला नियंत्रणात आणण्यासाठी क्लिपिंग रॅपने बांधून ठेवले होते. त्यानंतर विमानाचं एमर्जन्सी लँडिंग करण्यात आली.