तालिबानींच्या हाती लागला सोन्याचा खजिना; अमरुल्लांच्या घरावर छापा, नोटा मोजताना दमछाक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 05:57 AM2021-09-15T05:57:02+5:302021-09-15T05:57:34+5:30
तालिबानला पंजशीरमधून प्रतिकार करणारे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांच्या घरातून तालिबानला माेठा खजिना हाती लागला आहे.
काबूल : तालिबानला पंजशीरमधून प्रतिकार करणारे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांच्या घरातून तालिबानला माेठा खजिना हाती लागला आहे. तालिबान्यांना सालेह यांच्या घरातून काेट्यवधी डाॅलर्स आणि साेन्याची बिस्किटे सापडली आहेत. नाेटा माेजताना तालिबान्यांना घाम फुटला. यासंबंधी एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
तालिबानच्या मल्टिमीडिया शाखेचा प्रमुख अहमदुल्ला मुत्तकी याने ट्विटरवर याबाबत एक व्हिडिओ पाेस्ट केला. सालेह यांच्या घरावर छापा मारल्याचा दावा त्याने केला आहे. (वृत्तसंस्था)
घरात काय काय सापडले?
- ६५ लाख डाॅलर्स, १८ साेन्याची बिस्किटे
- माेठ्या प्रमाणावर दागिनेही हाती लागले
पोटासाठी विकताहेत वस्तू
- तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्याच्या महिनाभरानंतर अनेक शहरांमध्ये भीषण चित्र दिसू लागले आहे.
- उत्पन्नाचे सर्व मार्ग बंद असल्याने दाेन वेळच्या जेवणासाठी लाेकांवर अक्षरश: घरातील वस्तू विकायची वेळ आली आहे. काबूलमध्ये चमन-ए-हाेजाेरी नावाचा एक बाजार आहे. तिथे लाेक घरातील भांडी, पंखे, साेफासेट इत्यादी वस्तू विकण्यासाठी घेऊन येत आहेत.