पाकिस्तानातील अतिरेकी संघटनांवर निर्बंधांसाठी अमेरिका-सौदी अरेबियात करार

By admin | Published: April 1, 2016 06:39 PM2016-04-01T18:39:04+5:302016-04-01T18:39:04+5:30

पाकिस्तानातील दहशतवादी संघटना आणि व्यक्तींवर निर्बंध आणण्यासाठी गुरुवारी अमेरिका आणि सौदी अरेबियाने हातमिळवणी केली.

Treaty in US-Saudi Arabia for the restrictions on terrorist organizations in Pakistan | पाकिस्तानातील अतिरेकी संघटनांवर निर्बंधांसाठी अमेरिका-सौदी अरेबियात करार

पाकिस्तानातील अतिरेकी संघटनांवर निर्बंधांसाठी अमेरिका-सौदी अरेबियात करार

Next

ऑनलाइन लोकमत 

वॉशिंग्टन, दि. १ - पाकिस्तानातील दहशतवादी संघटना आणि व्यक्तींवर निर्बंध आणण्यासाठी गुरुवारी अमेरिका आणि सौदी अरेबियाने हातमिळवणी केली. अमेरिका आणि सौदी अरेबियामधील करारानुसार पाकिस्तानातील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोएबावरही निर्बंध येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रियाध भेटीच्या काहीतास आधी हा निर्णय जाहीर झाला. 
 
अलकायदा, तालिबान आणि लष्कर-ए-तोएबाचा निधी रोखून त्यांचे जाळे मोडण्यासाठी अमेरिका आणि सौदी अरेबिया संयुक्तपणे कारवाई करणार आहेत. अलकायदा, तालिबान आणि लष्कर-ए-तोएबाचा हिंसाचाराचा इतिहास आहे. त्यांनी अमेरिका आणि दक्षिण आशियातील आमच्या सहका-यांना त्रस्त केले आहे असे अमेरिकेने म्हटले आहे. 
 
लष्कर-ए-तोएबाचा नावीद कामर,अब्दुल अझीझ नुरीस्तानी आणि मोहम्मद इजाज साफराश यांच्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. मुंबईवरील २६/11 दहशतवादी हल्ला लष्कर-ए-तोएबाने घडवून आणला होता. युरोपियन परिषदेसाठी बेल्जियममध्ये गेलेले मोदी अण्विक सुरक्षा परिषदेनंतर शुक्रवारी संध्याकाळी रियाधसाठी रवाना होणार आहेत. 

Web Title: Treaty in US-Saudi Arabia for the restrictions on terrorist organizations in Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.