ट्रम्प यांच्यावर जिंदाल यांची टीका

By admin | Published: March 18, 2016 01:42 AM2016-03-18T01:42:21+5:302016-03-18T01:42:21+5:30

रिपब्लिकनचे आघाडीचे उमेदवार म्हणून डोेनाल्ड ट्रम्प यांचा झालेला उदय पक्षासाठी मृत्यूच्या घंटेसमान वाटत आहे, असे मत भारतीय- अमेरिकी नागरिक आणि ल्युसियानाचे माजी गव्हर्नर

Trial of Jindal on Trump | ट्रम्प यांच्यावर जिंदाल यांची टीका

ट्रम्प यांच्यावर जिंदाल यांची टीका

Next

वॉशिंग्टन : रिपब्लिकनचे आघाडीचे उमेदवार म्हणून डोेनाल्ड ट्रम्प यांचा झालेला उदय पक्षासाठी मृत्यूच्या घंटेसमान वाटत आहे, असे मत भारतीय- अमेरिकी नागरिक आणि ल्युसियानाचे माजी गव्हर्नर बॉबी जिंदाल यांनी व्यक्त केले आहे.
व्हाईट हाऊसच्या शर्यतीत सहभागी १७ रिपब्लिकन उमेदवारांमध्ये जिंदाल (४४) यांचा समावेश होता. तथापि, पुरेसा पाठिंबा न मिळाल्यामुळे ते स्पर्धेतून बाहेर पडले. जिंदाल बुधवारी ‘एमएसएनबीसी’च्या ‘मीट द प्रेस’ कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, मतदार चिडलेले आणि निराश आहेत. या नाराजीला काहीअंशी रिपब्लिकन पार्टीही जबाबदार आहे. ट्रम्प यांना ‘वेकअप कॉल’ मानले जायला हवे. जिंदाल हे ट्रम्प यांचे कडवे टीकाकार आहेत.

Web Title: Trial of Jindal on Trump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.