टि¦टर कर्मचा:यांना इसिसच्या धमक्या
By admin | Published: October 12, 2014 02:03 AM2014-10-12T02:03:57+5:302014-10-12T02:03:57+5:30
टि¦टरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डिक कोस्टोलो यांनी आमच्या कर्मचा:यांना इसिसच्या दहशतवाद्यांनी ठार मारायची धमकी दिल्याचे मान्य केले आहे.
Next
>न्यूयॉर्क : टि¦टरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डिक कोस्टोलो यांनी आमच्या कर्मचा:यांना इसिसच्या दहशतवाद्यांनी ठार मारायची धमकी दिल्याचे मान्य केले आहे. दहशतवाद्यांचे टि¦टर अकाऊंटस् डिलिट केल्याबद्दल ही धमकी आल्याचे कोस्टोलो यांचे म्हणणो आहे. टि¦टरने दहशतवाद्यांचे अकाऊंटस् डिलिट करायला सुरुवात करताच आमच्या कर्मचा:यांना ठार मारायच्या धमक्या येऊ लागल्या, असे कोस्टोलो म्हणाले. सॅनफ्रॅन्सिस्कोमध्ये या आठवडय़ात झालेल्या व्हॅनिटी फेअर न्यू इस्टाब्लिशमेंट समीटमध्ये कोस्टोलो बोलत होते. आयएसचे अकाऊंटस् डिलिट करताच आयएसशी संबंधित असलेल्या व टि¦टर वापरणा:या काही लोकांनी टि¦टरच्या कर्मचा:यांना व टि¦टरच्या व्यवस्थापनास ठार मारले पाहिजे, असे जाहीर केले, असे कोस्टोलो म्हणाले. अशा प्रसंगांना तोंड देणो हे मानसिकदृष्टय़ा कोणालाही धक्कादायक असते, असे कोस्टोलो म्हणल्याचे सीएनईटी संकेतस्थळाने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)