स्नोडेनला दोषी ठरविण्याचे प्रयत्न
By admin | Published: May 31, 2014 05:54 AM2014-05-31T05:54:22+5:302014-05-31T05:54:22+5:30
अमेरिकन सरकारने स्नोडेनचे एक ई-मेल प्रसिद्ध केले असून, त्याने मुलाखतीत केलेले दावे खोटे पाडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे
वॉशिंग्टन : अमेरिकन सरकारने स्नोडेनचे एक ई-मेल प्रसिद्ध केले असून, त्याने मुलाखतीत केलेले दावे खोटे पाडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अमेरिकेची राष्टÑीय तपास संस्था एनएसएकडून केल्या जाणार्या नागरिकांच्या हेरगिरीबाबत आपण ई-मेल पाठवून चिंता व्यक्त केली होती, असा स्नोडेनचा दावा होता. एनएसएच्या प्रमुखांना लिहिलेले हे ई-मेल आज प्रसिद्ध करण्यात आले आहे. स्नोडेनने वॉशिंग्टन पोस्टला दिलेल्या मुलाखतीत आपल्याला अमेरिकेच्या हेरगिरीची फार चिंता वाटत होती. या ई-मेलमध्ये तसे काहीच नसल्याचे व्हाईट हाऊसचे प्रवक्ते जे कार्ने यांनी म्हटले आहे. स्नोडेनने असे ई-मेल पाठविले नसल्याचे एनएसएने डिसेंबरमध्ये म्हटले होते; पण कसून चौकशी केल्यानंतर असे एक ई-मेल मिळाले, असे एनएसएने म्हटले आहे. ई-मेल प्रसिद्ध झाल्याचे कळताच आता सत्य बाहेर येईल, असे स्नोडेनने म्हटले आहे. (वृत्तसंस्था) स्नोडेनने त्याला मिळालेली गोपनीय माहिती बाहेर फोडण्याऐवजी त्याने अमेरिका सरकारच्या संबंधित विभागाकडे यासंदर्भातील चिंता व्यक्त करायला हवी होती; पण स्नोडेनने आपण योग्य त्या मार्गाने गेलो, असा दावा केला आहे. स्नोडेनने एनबीसी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपल्याला घरी परतायचे आहे, असा दावा केला आहे; पण अमेरिकेत परतायचे असल्यास आपल्याला माफी वा दया मिळावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.