काबूलमध्ये ट्रकबॉम्बचा स्फोट, १५ ठार
By admin | Published: August 7, 2015 10:13 PM2015-08-07T22:13:05+5:302015-08-07T22:13:05+5:30
अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये शुक्रवारी ट्रकबॉम्बचा स्फोट घडवून आणण्यात आला. यात १५ ठार, तर २४0 हून अधिक लोक जखमी झाले
काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये शुक्रवारी ट्रकबॉम्बचा स्फोट घडवून आणण्यात आला. यात १५ ठार, तर २४0 हून अधिक लोक जखमी झाले. तालिबानचा नेता मुल्ला ओमरचा मृत्यू झाल्याच्या घोषणेनंतर राजधानीत झालेला हा पहिलाच मोठा हल्ला आहे. हा स्फोट एवढा प्रचंड होता की रस्त्यावर प्रचंड मोठा खड्डा पडला.
तालिबानमध्ये सत्ता हस्तांतरणावरून अंतर्गत वाद विकोपाला गेला असूनही या संघटनेने हल्ले वाढविले असताना काबूलला हादरून सोडणारा स्फोट झाला; मात्र कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली नाही.
शहराच्या पूर्वेकडील शाह शहीद वसाहतीत हा स्फोट झाला असला तरी तो एवढा प्रचंड होता की, त्यामुळे शहरातील इमारती आणि घरांची
मोठी हानी झाली. मृतांत महिला आणि मुलांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)