हे त र यु द्ध च ! , फ्रान्समधील वृत्तपत्राकडून वर्णन
By admin | Published: November 15, 2015 02:39 AM2015-11-15T02:39:06+5:302015-11-15T02:39:06+5:30
पॅरिसमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचे वर्णन येथील वृत्तपत्रांनी ‘हे तर युद्धच’ असे केले असून, देश अशा प्रकारांना खंबीरपणे तोंड देणार असल्याचे म्हटले आहे.
पॅरिसमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचे वर्णन येथील वृत्तपत्रांनी ‘हे तर युद्धच’ असे केले असून, देश अशा प्रकारांना खंबीरपणे तोंड देणार असल्याचे म्हटले आहे. विविध दैनिकांत प्रसिद्ध झालेल्या बातम्या पाहता फ्रान्स खंबीर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सर्वच वृत्तपत्रांनी पॅरिसमध्ये विविध ठिकाणी झालेल्या नरसंहाराची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. ‘या वेळी हे युद्ध आहे’ असा मथळा ‘ली पेरिसिन’ या वृत्तपत्राने दिला आहे. डाव्या विचारसरणीकडे झुकलेल्या ‘ली फिगारो’ या वृत्तपत्रामध्येही असेच ध्वनित करताना ‘मध्य पॅरिसमध्ये युद्ध’ असा मथळा
दिला आहे. वृत्तपत्राने या हल्ल्यातील नरसंहाराची छायाचित्रेही प्रसिद्ध केली आहेत. अनेक वृत्तपत्रांनी या जिहादी हल्ल्याचा एकजुटीने मुकाबला करण्याचे आवाहन केले आहे. जानेवारी महिन्यातच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात
१७ लोक ठार झाले होते. ‘ली पेरिसन’ या वृत्तपत्राने म्हटले आहे की, खऱ्या शहिदांच्या नावासाठी, निरपराध पीडितांसाठी आणि लोकशाहीसाठी फ्रान्समधील जनतेने एकजूट होऊन एकत्रित राहिले पाहिजे. डाव्या विचारसरणीकडे झुकलेल्या ‘लिबरेशन’ या दैनिकाच्या प्रमुखांनी फ्रान्सने दृढ राहण्याचे आवाहन करताना दहशतवाद्यांनी ऐतिहासिक रेषेचे उल्लंघन केल्याचे म्हटले आहे.