काश्मीरप्रश्नी मध्यस्थीची गरज नाही; ट्रम्प यांच्यासमोरच मोदींनी पाकला ठणकावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 04:50 PM2019-08-26T16:50:40+5:302019-08-26T19:30:19+5:30

बेलारित्झ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची जी 7 संमेलनात भेट झाली आहे.

Trump Backs Off on Kashmir Mediation, Says India-Pakistan Can Sort Issue Out Bilaterally | काश्मीरप्रश्नी मध्यस्थीची गरज नाही; ट्रम्प यांच्यासमोरच मोदींनी पाकला ठणकावलं

काश्मीरप्रश्नी मध्यस्थीची गरज नाही; ट्रम्प यांच्यासमोरच मोदींनी पाकला ठणकावलं

Next

बेलारित्झ- पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर असून, बेलारित्झ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची जी 7 संमेलनात भेट झाली. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर मुद्द्यावर चर्चा केली. ट्रम्प म्हणाले, रविवारी रात्री काश्मीर मुद्द्यावर मोदी आणि माझ्यात चर्चा झाली. मोदींच्या म्हणण्यानुसार, काश्मीरचा मुद्दा हा भारताच्या नियंत्रणात आहे.

आम्ही पाकिस्तानशी या मुद्द्यावर चर्चा करू आणि तोडगा काढू. तर दुसरीकडे मोदींनीही डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच पाकला ठणकावलं आहे. पाकिस्तानबरोबर जे सुद्धा मुद्दे आहेत द्विपक्षीय आहेत. भारत-पाक द्विपक्षीय संबंधांतून काश्मीर मुद्दा सोडवू, हा प्रश्न सोडवण्यासाठी कोणत्याही तिसऱ्या देशाला त्रास देणार नाही. आम्ही चर्चेच्या माध्यमातून या मुद्द्यावर तोडगा काढू, असं आश्वासनही मोदींनी ट्रम्प यांना दिलं आहे.

भारत-पाक हे दोन्ही देश 1947पूर्वी एकच होते. त्यामुळे आम्ही या मुद्द्यावर चर्चा करून हा प्रश्न सोडवू, असंही मोदींनी सांगितलं आहे. 

काश्मीरवर चर्चा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टपणे जम्मू आणि काश्मीरमध्ये मानवाधिकाराचं उल्लंघन झालं नसल्याचं सांगितलं आहे. या भेटीत भारत अमेरिका यांच्यातील व्यापाराबाबतही चर्चा झाल्याची माहिती आहे. चीन आणि अमेरिका यांच्यातील ट्रेड वॉरमुळे जगातील अन्य देशांना मंदीचा फटका बसू लागला आहे. यावरही चर्चा झाली आहे.

इकोनॉमिक्स टाइम्सच्या वृत्तानुसार बहुतांश अमेरिका कंपन्या या ट्रेड वॉरमुळे आपलं बस्तान चीनऐवजी भारतात शिफ्ट करण्याची योजना बनवित आहेत. जवळपास 250 पेक्षा अधिक कंपन्या भारतात येण्यासाठी इच्छुक आहेत. अमेरिकेच्या सूत्रांनी सांगितल्यानुसार राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीतून खूप अपेक्षा आहेत. या भेटीत रणनीती, भागीदारी, दहशतवाद आणि व्यापार याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. भारताची बाजारपेठ अमेरिकी कंपन्यांसाठी खुली करावी, असं अमेरिकेला वाटतं.  

Web Title: Trump Backs Off on Kashmir Mediation, Says India-Pakistan Can Sort Issue Out Bilaterally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.