ट्रम्पमुळे आला त्यांच्या नात्यात दुरावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2017 09:01 PM2017-02-08T21:01:39+5:302017-02-08T21:04:29+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आता पती-पत्नीच्या नात्यात दुराव्याचे कारण बनले आहेत.
Next
>ऑनलाइन लोकमत
लॉस एंजेलिस, दि. 8 - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या वादग्रस्त निर्णयांनी जगभरात खळबळ उडवली आहे. कमालीचे हट्टी आणि फटकळ असलेल्या ट्रम्पनी अनेक राष्ट्रांच्या प्रमुखांनाही अपमानित केले आहे. मात्र आता ट्रम्प एका पती पत्नीच्या नात्यात दुराव्याचे कारण बनले आहेत.लॉस एंजेलिसमध्ये ट्रम्पचा कट्टर समर्थक असलेल्या पतीला पत्नीने सोडल्याची घटना समोर आली आहे.
कॅलिफोर्नियातील तुरुंगाची माजी कर्मचारी असलेल्या गेल मैककॉर्मिक या 73 वर्षीय महिलेने तिचा ट्रम्पसमर्थक 77 वर्षिय पती बिल मॅककॉर्मिक याला तो ट्रम्प समर्थक असल्याचे कारण देत सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत गेल मॅककॉर्मिक म्हणाल्या की, गेल्यावर्षी बिल मॅककॉर्मिक यांनी आपल्या मित्रांशी बोलताना ट्रम्प यांना आपले मत देण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यांचा हा निर्णय ऐकून मी हादरलेच! तेथेच आमच्या नात्याचा शेवट झाला." गेल मॅककॉर्मिक सध्या वॉशिंग्टनमध्ये एकट्याच राहत आहेत. अशा प्रकारे अमेरिकेचे मिस्टर प्रेसिडेंट त्यांच्या नात्यातील दुराव्याचे कारण बनले.