न्यूयॉर्कमध्ये ट्रम्प, हिलरी विजयी
By admin | Published: April 20, 2016 08:11 AM2016-04-20T08:11:18+5:302016-04-20T08:24:48+5:30
न्यूयॉर्क येथे पार पडलेल्या प्राथमिक निवडणुकीत डेमोक्रॅटिक पार्टीच्या हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांनी विजय मिळवला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
न्यूयॉर्क, दि. २० - न्यूयॉर्क येथे पार पडलेल्या प्राथमिक निवडणुकीत डेमोक्रॅटिक पार्टीच्या हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांनी विजय मिळवला आहे. ट्रम्प यांना 65 टक्के मते मिळाली, तर जॉन कॅसिच 21 टक्के मत मिळवून दुस-या स्थानावर राहिले. क्रूज यांना फक्त 14 टक्के मतदारांचा पाठिंबा मिळाला. हिलरी क्लिंटन यांना 61 टक्के मत मिळाली तर सँडर्स यांना 39 टक्के मतदारांचा पाठिंबा मिळाला.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयामुळे प्रतिनिधींची संख्या वाढली असून उमेदवारी मिळण्याची शक्यता वाढली आहे. तर दुसरीकडे हिलरी क्लिंटन यांनीदेखील विजय मिळवला आहे. हिलरी क्लिंटन आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा हा विजय आतापर्यंतचा मोठा विजय मानला जात आहे. मंगळवारी 5 राज्यांमध्ये प्राथमिक निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे हा विजय त्यांच्या पुढील निवडणुकांमध्ये महत्वाची भुमिका पार पाडले असं म्हटलं जात आहे.
अमेरिकन अध्यक्षपद निवडणुकीसाठी रिपब्लिकन व डेमोक्रॅ्रटिक पक्षाकडून उमेदवारी मिळविण्याच्या स्पर्धेत अनुक्रमे ट्रम्प व हिलरी आघाडीवर आहेत. नोव्हेंबरमध्ये ही निवडणूक पार पडणार आहे. त्यासाठी उमेदवार निवडणुकीची प्रक्रिया चालू आहे. त्याचाच भाग म्हणून राज्या राज्यात उमेदवार निवडीसाठी मतदान घेतले जात आहे.