ट्रम्प-किम जोंग उन यांची आज बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 05:58 AM2018-06-12T05:58:54+5:302018-06-12T05:58:54+5:30

संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या शिखर परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन सिंगापूरमध्ये दाखल झाले असून, त्या दोघांमध्ये उद्या मंगळवारी भेट होत आहे.

 Trump-Kim Jong Meet today | ट्रम्प-किम जोंग उन यांची आज बैठक

ट्रम्प-किम जोंग उन यांची आज बैठक

Next

सिंगापूर : संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या शिखर परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा
किम जोंग उन सिंगापूरमध्ये दाखल झाले असून, त्या दोघांमध्ये उद्या मंगळवारी भेट होत आहे. त्रयस्थ देश या नात्याने यजमानपद करणाऱ्या सिंगापूरला या बैठकीसाठी तब्बल २० दशलक्ष सिंगापूर डॉलर खर्च येणार आहे.
उत्तर कोरियाचे सत्ताधीश झाल्यापासून प्रथमच सर्वात लांबचा विमान प्रवास करून किम जोंग
उन एअर चायनाच्या विमानाने प्योंग्यागहून येथे पोहोेचले, तर जी-७ देशांच्या शिखर परिषदेसाठी कॅनडात गेलेले ट्रम्प थेट तेथून आले. सोमवारी दोन्ही देशांच्या प्रतिनिधी मंडळात उद्याच्या चर्चेच्या तयारीसाठी अनेक बैठका झाल्या. उत्तर कोरियाने अण्वस्त्र चाचण्या घेतल्यामुळे दक्षिण कोरिया अतिशय चिंतेत होता, तर रशियाने उत्तर कोरियावर निर्बंध
घातले होते.
मात्र त्यानंतर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग व किम यांच्या भेटीनंतर उत्तर कोरियाने एक पाऊल मागे
घेतले आणि अण्वस्त्र चाचण्या बंद केल्या. तसेच प्रथमच उत्तर कोरिया व दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष एकमेकांना भेटले आणि वातावरण अधिक सुधारण्याचे दोघांत मान्य झाले. (वृत्तसंस्था)

सेंटोसा बेटावर बैठक

त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प व किंम जोंग उन यांच्यात सिंगापूरच्या सेंटोसा बेटावर बैठक होत आहे. हे दोन नेते प्रथमच एकमेकांना भेटणार आहेत. कोरियन उपखंड अण्स्त्रमुक्त करणे हा या बैठकीचा हेतू असल्याने त्याला यश येते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कॅनडाहून रवाना होताना स्वत: ट्रम्प म्हणाले की, ऐन वेळी बैठकीत आयत्या वेळी काय निर्णय होणार, यावर या बैठकीचे फलित अवलंबून असेल.

Web Title:  Trump-Kim Jong Meet today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.