मादाम तुसाँमधूनही ओबामांच्या जागी ट्रम्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2017 04:12 PM2017-01-22T16:12:42+5:302017-01-22T16:38:43+5:30

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदापाठोपाठ आता लंडनमधील मादाम तुसाँ म्युझियममध्येही बराक ओबामांची जागा घेतली आहे.

Trump to replace Obama in Madame Tusson | मादाम तुसाँमधूनही ओबामांच्या जागी ट्रम्प

मादाम तुसाँमधूनही ओबामांच्या जागी ट्रम्प

Next

ऑनलाइन लोकमत

लंडन, दि. 22 : अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदापाठोपाठ आता लंडनमधील मादाम तुसाँ म्युझियममध्येही बराक ओबामांची जागा घेतली आहे. काल डोनाल्ड ट्रम्प यांच्या मेणाच्या पुतळ्याचे मादाम तुसाँ म्युझियममध्ये अनावरण करण्यात आले. त्यांच्या पुतळा हुबेहूब ट्रम्प यांची प्रतिकृती वाटते. उन्हामुळे टॅन झालेली त्वचा आणि विशिष्ट पद्धतीने विंचरलेले केस दाखवण्यात आले आहेत.
 
ट्रम्प यांचा पुतळा बनवण्यासाठी सुमारे सव्वा कोटी रुपयांचा खर्च आला आहे. ट्रम्प यांच्या पुतळ्याला निळ्या रंगाचा सूट, पांढरा शर्ट आणि लाल टाय परिधान केली आहे. हा पुतळा व्हाईट हाऊसमधील ओव्हल ऑफिसप्रमाणे असलेल्या सेटअपमध्ये ठेवण्यात आला आहे.
 
या संग्रहालयात डोनाल्ड ट्रम्प यांच्याशिवाय रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन, ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री बोरिस जॉन्सन यांचा पुतळाही आहे. 
मादाम तुसाँच्य़ा ट्विटरवर  डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुतळ्याचा फोटो शेअर करण्यात आला आहे. 20 कलाकारांनी सहा महिन्यात हा पुतळा साकारला आहे.
 
मादाम तुसाँ म्युझियमच्या ओव्हल ऑफिस सेटअपमध्ये ट्रम्प यांचा पुतळा ठेवल्यानंतर, तिथून अमेरिकेचे मावळते अध्यक्ष बराक ओबामा यांचा पुतळा हटवला आहे.
 

Web Title: Trump to replace Obama in Madame Tusson

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.