ट्रम्प म्हणाले, ओबामांनी राजीनामा द्यावा
By admin | Published: June 14, 2016 04:34 AM2016-06-14T04:34:29+5:302016-06-14T04:34:29+5:30
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपद निवडणुकीतील संभाव्य रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘गे नाइट क्लब’मधील गोळीबाराच्या घटनेसाठी ‘कट्टर इस्लामी दहशतवाद’ ही संज्ञा न वापरल्याबद्दल
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपद निवडणुकीतील संभाव्य रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘गे नाइट क्लब’मधील गोळीबाराच्या घटनेसाठी ‘कट्टर इस्लामी दहशतवाद’ ही संज्ञा न वापरल्याबद्दल अध्यक्ष बराक ओबामा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दुसरीकडे त्यांच्या प्रतिस्पर्धी व डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी दहशतवादी संघटनांना धूळ चारण्यासाठी प्रयत्न वाढविण्यास पाठिंबा दर्शविला.
ट्रम्प यांनी अनेक टिष्ट्वट करून ओरलँडो हल्ल्यासाठी कट्टर इस्लामी दहशतवादाला दोष न दिल्याबद्दल ओबामांवर टीका केला. ओबामा आता तरी ‘कट्टर इस्लामी दहशतवाद’ असा शब्दप्रयोग करणार आहेत की नाहीत? जर ते करणार नसतील, तर त्यांनी तत्काळ पदाचा राजीनामा द्यावा, असे त्यांनी एका टिष्ट्वटमध्ये म्हटले. (वृत्तसंस्था)
शिखांना आपल्यावर हल्ले होण्याची वाटते भीती
ओरलँडो येथे शनिवारी रात्री झालेल्या ५० जणांच्या हत्याकांडानंतर सूड म्हणून आपल्यावर हल्ले होतील, अशी भीती शीख समाजाला वाटत आहे. अमेरिकेमध्ये मोठ्या हत्याकांडानंतर शिखांना ते मुस्लिमांसारखे दिसतात, एवढ्या कारणावरून गंभीर स्वरूपाचे हल्ले झाले आहेत.
ओबामा यांनी शिखांना सुरक्षिततेचे आश्वासन दिले आहे. व्हाइट हाउसने वरिष्ठ अधिकाऱ्याला येथील गुरुद्वारात रविवारी शीख समाजाच्या नेत्यांची भेट घेण्यास पाठविले होते. त्यानुसार, शिखांची सुरक्षितता आणि त्यांचे उद्योग, व्यवसाय आदींच्या संरक्षणाचे आश्वासन अधिकाऱ्याने दिले. शीख कौन्सिल आॅन रीलिजन अँड एज्युकेशनचे अध्यक्ष राजवंत सिंग म्हणाले की, ‘आपल्यावर हल्ले होतील,’ अशी भीती शिखांना वाटत आहे.