बंद म्हणजे बंदच... अमेरिकेतही टिकटॉकवरील बंदी आदेशावर ट्रम्प यांची स्वाक्षरी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2020 05:16 AM2020-08-08T05:16:25+5:302020-08-08T05:16:37+5:30
देशाची राष्ट्रीय सुरक्षा, अर्थव्यवस्था यांना धोका असल्याचे दिले कारण
वॉशिंग्टन : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉक आणि वुईचॅट या चिनी अॅप्सवर बंदी घालणाऱ्या आदेशांवर स्वाक्षºया केल्या आहेत. या अॅप्सचा देशाची राष्ट्रीय सुरक्षा आणि अर्थव्यवस्था यांना धोका असल्याचे या बंदी आदेशात नमूद करण्यात आले आहे. दोन स्वतंत्र आदेश जारी
या अॅप्सवर अमेरिकेत बंदी घालण्यात आली आहे. ४५ दिवसांत आदेशांची अंमलबजावणी सुरू होणार आहे. टिकटॉक आणि वुईचॅट या अॅप्सवर बंदी घालणारा भारत हा जगातील पहिला देश आहे. भारताने १०६ चिनी अॅप्सवर बंदी घातली आहे.
आपल्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी अमेरिकेने टिकटॉकविरुद्ध आक्रमक धोरण स्वीकारणे अत्यावश्यक आहे, ट्रम्प यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. वुईचॅटविरोधातील बंदी आदेशातही ट्रम्प यांनी हेच नमूद केले आहे. टिकटॉकचे अमेरिकेत ८० दशलक्ष मासिक वापरकर्ते आहेत. विशीच्या आतील मुलांत हे अॅप लोकप्रिय आहे. हे अॅप चिनी कंपनी ‘बाइटडान्स लि.’च्या मालकीचे आहे. सूत्रांनी सांगितले की, टिकटॉकचे भारतात ६०० दशलक्ष वापरकर्ते होते. अॅपची मालकी मायक्रोसॉफ्टकडे गेल्यास ते भारतात पुन्हा सुरू केले जाऊ शकते. गलवान खोºयातील चीनच्या आगळिकीनंतर चीनविरुद्ध निर्माण झालेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर या अॅपवर भारतात बंदी घालण्यात आली आहे.
टिकटॉकचे भारतात होऊ शकते पुनरागमन
टिकटॉकचे संपूर्ण जगातील परिचालन अधिग्रहित करण्याचा विचार मायक्रोसॉफ्ट करीत आहे. तसे झाल्यास टिकटॉकचे भारतात पुनरागमन होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. टिकटॉकला अमेरिकेत व्यवसाय करायचा असल्यास त्यावर अमेरिकी कंपनीचाच ताबा असायला हवा, असे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधीच बजावले आहे. त्यासाठी कंपनीला १५ सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे.