ट्रम्प समर्थकांकडून दहशतवाद्यांना अमेरिकेत येण्याचं निमंत्रण
By admin | Published: May 22, 2016 07:05 PM2016-05-22T19:05:10+5:302016-05-22T21:20:38+5:30
ट्रम्प यांच्या शीख-अमेरिकनं समर्थकांनी टि्वटरच्या माध्यमातून दहशतवाद्यांना अमेरिकेत येण्यासाठी निमंत्रण दिलं आहे.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. 22- ट्रम्प यांच्या शीख-अमेरिकनं समर्थकांनी टि्वटरच्या माध्यमातून दहशतवाद्यांना अमेरिकेत येण्यासाठी निमंत्रण दिलं आहे. मात्र मूळचे भारतीय वंशाचे परिषदेतील प्रतिनिधी रवींद्र भाल्ला यांनी याबाबत ट्रम्प यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. तुम्हाला अमेरिकन असण्याचा बहुदा अर्थ माहीत नसावा, अशी खोचक टीका भाल्ला यांनी ट्रम्प यांच्यावर केली आहे.
रवींद्र भाल्ला हे न्यू जर्सींतल्या होबोकेन या शहरातल्या नगर परिषदेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी ट्रम्प यांच्या समर्थकांना या कृत्याबाबत टि्वटरच्या माध्यमातूनच चोख प्रत्युत्तर दिलंय. भाल्लांच्या टि्वटनंतर ट्रम्प यांचे समर्थक रॉबर्ट डुबेनेझिकही त्यांच्यावर तुटून पडले आहेत.
भाल्ला हे एका नगर परिषदेचे अध्यक्ष असल्याचं ऐकून आम्हाला आश्चर्य वाटतं आहे, असं रॉबर्ट डुबेनेझिक म्हणालेत. भारतीय वंशाचे भाल्ला होबोकेन शहराच्या नगर परिषदेचे अध्यक्ष होऊ शकतात, मग अमेरिकेत येण्यासाठी आपण दहशतवाद्यांना का परवानगी देऊ शकत नाही, असा सवालही रॉबर्ट यांनी केला आहे.