ट्रम्प ऑक्टोपससारखे शरीराला चिकटले - महिलेचा आरोप
By admin | Published: October 13, 2016 03:39 PM2016-10-13T15:39:52+5:302016-10-13T15:58:06+5:30
अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर दोन महिलांनी गंभीर आरोप केला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. १३ - परवानगीशिवाय कधी कुठल्या महिलेचं चुंबन घेतलं नाही अस सांगणारे अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर दोन महिलांनी गंभीर आरोप केला आहे. मॅनहॅटन येथे रहाणा-या जेसिका लीडस यांनी ट्रम्प यांचा दावा खोडून काढला आहे. सध्या त्या ७४ वर्षांच्या आहेत.
तीन दशकापूर्वी मी विमानामधून बिझनेस क्लासने न्यूयॉर्कला चालली होती. ट्रम्प माझ्या शेजारी बसले होते. विमानाने उड्डाण केल्यानंतर ४५ मिनिटांनी ट्रम्प यांनी त्यांचा हात उचलला व माझ्या शरीराला स्पर्श केला. ट्रम्प माझ्या शरीराला ऑक्टोपससारखे चिकटले. त्यांचे हात माझ्या शरीरावर सर्वत्र फिरत होते. मी लगेच तिथून उठले व विमानात मागच्या बाजूला पळाले. त्यांनी माझा विनयभंग केला होता. लीडस यांनी न्यूयॉर्क टाइम्स बरोबर बोलताना हा खळबळजनक दावा केला.
राचले क्रूकनेही ट्रम्पवर अशाच प्रकारचा आरोप केला आहे. त्यावेळी राचेल २२ वर्षांची होती. बेरॉक ग्रुप या रिअल इस्टेट कंपनीत राचेल रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. मॅनहॅटन येथील ट्रम्प टॉवरच्या इमारतीमध्ये तिच्या कंपनीचे कार्यालय होते. २००५ साली इमारतीच्या लिफ्टबाहेर राचेलची पहिल्यांदा ट्रम्प बरोबर ओळख झाली.
राचेलच्या कंपनीचे ट्रम्प यांच्या कंपनीबरोबर व्यावसायिक संबंध होते हे राचेलला ठाऊक होते. त्यामुळे तिने ट्रम्प यांच्याशी हस्तांदोलन करताना स्वत:ची ओळख करुन दिली. पण ट्रम्प यांनी राचेलचा हात सोडला नाही. त्यांनी थेट माझ्या गालावर चुंबन दिले. हा अपघात नव्हता तो विनयभंगच होता असे राचेलने सांगितले.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महिलांना दुय्यम स्थान देत असल्याचा आरोप होत असून, अलीकडच्या दिवसांमध्ये त्यांनी महिलांबद्दल अनेक अपमानास्पद वक्तव्ये केली आहेत. या नव्या आरोपांमुळे ट्रम्प यांच्यासमोरील अडचणी अधिक वाढणार आहेत.