माजी सहकाऱ्यांवरील गुन्हे सिद्ध झाल्याने ट्रम्प अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 03:16 AM2018-08-23T03:16:59+5:302018-08-23T03:17:17+5:30

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी निवडणूक प्रचारप्रमुख पॉल मॅनाफोर्ट यांना आर्थिक घोटाळा प्रकरणात दोषी ठरविण्यात आले आहे.

Trump Trouble proved to be a crime against former colleagues | माजी सहकाऱ्यांवरील गुन्हे सिद्ध झाल्याने ट्रम्प अडचणीत

माजी सहकाऱ्यांवरील गुन्हे सिद्ध झाल्याने ट्रम्प अडचणीत

Next

न्यूयॉर्क : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी निवडणूक प्रचारप्रमुख पॉल मॅनाफोर्ट यांना आर्थिक घोटाळा प्रकरणात दोषी ठरविण्यात आले आहे. तसेच २०१६च्या अध्यक्षीय निवडणुकीआधी पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनियल्स हिने काही गोष्टींबाबत मौन बाळगावे म्हणून तिला पैसे चारल्याचे त्यांचे तत्कालीन वकील मायकेल कोहेन यांनी मान्य केले आहे. या दोन्ही गोष्टींमुळे ट्रम्प यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
ट्रम्प यांच्या बरोबर असलेल्या प्रेमप्रकरणाची वाच्यता करु नये म्हणून दोन महिलांना पैसे दिल्याची कबुली कोहेन यांनी दिली आहे. करचुकवेगिरी प्रकरणात त्यांना न्यायालयाने दोषी ठरविले आहे. निवडणूक प्रचार खर्चाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपकाही त्यांच्यावर आहे. उमेदवाराच्या सूचनेवरुनच स्टॉर्मी डॅनियल्सला पैसे दिल्याचे यांनी सांगितले. करघोटाळा व संशयास्पद आर्थिक व्यवहारांबाबत पॉल मॅनाफोर्ट यांना न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर कोहेन यांनीही गैरकृत्यांची कबुली दिली. अध्यक्षीय निवडणुकीत रशियाने जो हस्तक्षेप केला त्याची चौकशी स्पेशल कौन्सिल रॉबर्ट मुल्लर यांनी केली होती. त्यातून कोहेन व मॅनाफोर्ट संदर्भातील प्रकरणेही उजेडात आली होती.

Web Title: Trump Trouble proved to be a crime against former colleagues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.