ट्रम्प यांच्या इमिग्रेशन पॉलिसीचा 3 लाख भारतीयांना बसणार फटका
By admin | Published: February 22, 2017 05:49 PM2017-02-22T17:49:48+5:302017-02-22T17:49:48+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इमिग्रेशनच्या नव्या पॉलिसीमुळे 3 लाख भारतीय प्रवासी प्रभावित होणार आहेत.
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 22 - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या नव्या इमिग्रेशन पॉलिसीमुळे 3 लाख भारतीय प्रवासी प्रभावित होणार आहेत. ट्रम्प प्रशासनाच्या या इमिग्रेशन प्लॅननुसार अवैध दस्तावेज असलेल्या अमेरिकेत राहणा-या जवळपास 11 दशलक्ष प्रवाशांना तिथून काढून टाकण्याची भीती सतावते आहे.
अमेरिकेत अवैधरीत्या राहणा-या लोकांसाठी ट्रम्प प्रशासनानं एक गाइडलाइन प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे अवैधरीत्या प्रवाशांना अमेरिकेत राहणं कठीण जाणार आहे. होम लँड सिक्युरिटीच्या मते, अवैध प्रवाशांना अमेरिकेतून काढताना कोणत्याही विशिष्ट वर्गाला विशेष सूट देण्यात येणार नाही. तसेच अवैधरीत्या राहणा-या परदेशी प्रवाशांना ताब्यात घेण्याचे किंवा अटक करण्याचे अधिकार अधिका-यांना देण्यात येणार आहेत.
(मीडियावाले जनतेचे शत्रू)
(आमचे प्रशासन सहजपणे काम करतेय - डोनाल्ड ट्रम्प)
इमिग्रेशनच्या नव्या गाइडलाइनच्या माध्यमातून जास्त करून अवैध प्रवाशांना मेमो देण्यात आला असून, इतर प्रवाशांनाही त्याचा त्रास होण्याची शक्यता आहे. अमेरिकेत जवळपास 3 लाख प्रवासी असे आहेत ज्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे नाहीत. त्यामुळे एकंदरीतच भारतीय प्रवाशांना याचा धोका पोहोचण्याची शक्यता आहे.