अमेरिकेत ट्रम्प यांच्या लोकप्रियतेत वाढ

By admin | Published: December 20, 2015 12:07 AM2015-12-20T00:07:46+5:302015-12-20T00:07:46+5:30

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षातर्फे उमेदवारी मिळविण्यास इच्छुक असलेले दावेदार आणि न्यूयॉर्कमधील रिअल इस्टेट व्यावसायिक डोनाल्ड ट्रम्प

Trump's popularity increases in America | अमेरिकेत ट्रम्प यांच्या लोकप्रियतेत वाढ

अमेरिकेत ट्रम्प यांच्या लोकप्रियतेत वाढ

Next

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षातर्फे उमेदवारी मिळविण्यास इच्छुक असलेले दावेदार आणि न्यूयॉर्कमधील रिअल इस्टेट व्यावसायिक डोनाल्ड ट्रम्प यांची लोकप्रियता आणखी वाढली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या सर्वेक्षणात ३९ टक्के लोकप्रियतेसह ११ गुण मिळवून त्यांनी लोकप्रियतेचा नवीन स्तर गाठला आहे.
अमेरिकेत सर्व मुस्लिमांना अस्थायी स्वरूपात प्रवेश बंदी करावी, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले होते. त्यानंतर ६९ वर्षीय ट्रम्प यांच्या लोकप्रियतेत ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी टेड क्रुझ यांनी १८ टक्के, मार्को रुबियो ११ टक्के आणि बेन कार्सनने ९ टक्के गुण मिळविले आहेत. अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांच्या दावेदारीसाठी ‘फॉक्स न्यूज’तर्फे राष्ट्रीय स्तरावर सर्वेक्षण करण्यात आले होते. लास वेगास येथे १५ डिसेंबर रोजी या सर्व प्रतिस्पर्ध्यांमध्ये सार्वजनिक चर्चा झाली होती. (वृत्तसंस्था)

‘पब्लिक पॉलिसी पोलिंग’ या अन्य एका संस्थेतर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणातही ट्रम्प यांनीच लोकप्रियतेत बाजी मारली आहे. या सर्वेक्षणानुसार ट्रम्प यांना रिपब्लिकन मतदारांपैकी ३४ टक्के मतदारांनी पाठिंबा दिला आहे. त्यानंतर क्रूझ १८ टक्के, रुबियो १३ टक्के आणि जेब बुश ७ टक्के यांचा क्रमांक लागतो.

‘रिअल क्लीअर पॉलिटिक्स डॉट कॉम’तर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणातही ट्रम्प आणि ३३.८ टक्के गुण मिळवून लोकप्रियतेत आघाडी घेतली आहे. या सर्वेक्षणानुसार क्रूझ १६.६ टक्के, रुबियो १२.४ टक्के, कार्सन ११ टक्के आणि बुश ४.२ टक्के यांचा क्रमांक लागतो.ं

Web Title: Trump's popularity increases in America

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.