ट्रम्प यांचाही 'सबका साथ सबका विकास'चा वादा

By admin | Published: November 9, 2016 02:38 PM2016-11-09T14:38:53+5:302016-11-09T14:45:07+5:30

अमेरिकेचा मित्र होण्याची इच्छा असणा-या प्रत्येक देशाशी संबंध चांगले ठेवण्याचा तसंच सोबत नेण्याचा प्रयत्न करु असं अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प बोलले आहेत

Trump's promise of 'development with everyone' | ट्रम्प यांचाही 'सबका साथ सबका विकास'चा वादा

ट्रम्प यांचाही 'सबका साथ सबका विकास'चा वादा

Next
>ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 9 - सर्वांनी एकत्र येण्याची ही वेळ आहे. देशातील प्रत्येक नागरिकासाठी मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून काम करेन. सोबतच अमेरिकेचा मित्र होण्याची इच्छा असणा-या प्रत्येक देशाशी संबंध चांगले ठेवण्याचा तसंच सोबत नेण्याचा प्रयत्न करु असं अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प बोलले आहेत. राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यानंतर दिलेल्या भाषणात त्यांनी सर्वांचे आभार मानत आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांनी आपल्या पुढील अजेंडावर देखील उघडपणे मतं मांडत 'सबका साथ सबका विकास' धोरण स्विकारणार असल्याचं सांगितलं. 
 
(मतदारांनी 'ट्रम्प' कार्ड वापरत दिला हिलरींना धक्का)
(कशी होते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची निवड ?)
 
विजयानंतर हिलरी क्लिंटन यांनी मला फोन करुन शुभेच्छा दिल्या. त्यांनी खूप कडवी झुंज दिल्याचं डोनाल्ड ट्रम्प बोलले आहेत. सर्वांनी एकत्र येण्याची ही वेळ आहे. देशातील प्रत्येक नागरिकासाठी मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून काम करेन. आमचा प्रचार नव्हता तर एक आंदोलन होतं ज्यामध्ये देशावर प्रेम असणा-या हजारो पुरुष-महिलांनी सहभाग घेतला होता असं ट्रम्प यांनी सांगितलं. 
 
(अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक आणि भारत)
(US ELECTION - खलनायक नही नायक हूँ मै)
 
ज्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं, ते आता दुर्लक्षित राहणार नाहीत. ज्यांच्याकडे कौशल्य आहे त्यांना संधी देण्यात येईल. आमच्याकडे अर्थव्यवस्थेसाठी चांगला प्लान असून आपला विकास दुपटीने होईल. सर्व देशांना सोबत घेऊन आपण पुढची वाटचाल करणार आहोत असं ट्रम्प बोलले आहेत. जे बेस्ट आहे तेच दिलं जाईल. यशस्वी गोष्टींचाच विचार केला जाईल असंही ट्रम्प म्हणाले आहेत. 
 
(ट्रम्पनी केले मोदींना कॉपी, म्हणतात 'अब की बार ट्रम्प सरकार')
 
हा ऐतिहासिक दिवस असल्याचं सगळे बोलत आहेत, पण त्याला ऐतिहासिक करायचा असेल तर आपल्याला मोठं काम करावं लागेल, आणि ते करु असं मी तुम्हाला आश्वासन देतो. चार वर्ष किंवा आठ वर्ष झाल्यानंतर तुम्हाला गर्व वाटेल अशा गोष्टी झाल्या असतील असं आश्वासनही ट्रम्प यांनी दिलं. ट्रम्प यांनी आठ वर्षांचा कार्यकाळ म्हणत दुस-यांदाही निवडून येण्याचा विश्वास यानिमित्ताने व्यक्त केला.  
 
सर्वांना आश्चर्याचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जिंकली . अमेरिकेचे 45 वे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाली आहे.  सर्व अंदाज चुकवत डोनाल्ड ट्रम्प यांनी 276 मतसंघ मते मिळवून हिलरींचा दारुण पराभव केला. विजयासाठी 270 हा मॅजिक फिगर असतो. सर्वात आधी 270 मतसंघ मतं मिळवणारा उमेदवार विजेता ठरतो.  270 चा मॅजिक नंबर गाठण्यासाठी ट्रम्प आणि हिलरीमध्ये जोरदार चुरस दिसून आली.
 
अमेरिकेतील 50 पैकी 48 राज्यांतील नियमांनुसार त्या राज्यात सर्वाधिक मतं मिळवणाऱ्या पक्षालाच राज्यातील सर्व इलेक्टर्सचा पाठिंबा मिळतो. अमेरिकेतील सर्व राज्य आणि राजधानीचा डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया धरून एकूण 538 इलेक्टर्स आहेत. त्यापैकी 270 जणांचा पाठिंबा मिळवणारा उमेदवार राष्ट्राध्यक्षपदी निवडला जातो. 
 

Web Title: Trump's promise of 'development with everyone'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.