ट्रम्प यांच्या उदयाने अनेक कुटुंबांत भीती
By admin | Published: March 15, 2016 02:37 AM2016-03-15T02:37:39+5:302016-03-15T02:37:39+5:30
ट्रम्प यांना व्हाईट हाऊसमध्ये प्रवेशापासून रोखू इच्छितो असे मत व्यक्त केले आहे भारतीय अमेरिकी चिकित्सक व कवी अमित मजुमदार यांनी राजकारणात डोनाल्ड ट्रम्प यांच्या अचानक उदयामुळे
वॉशिंग्टन : ट्रम्प यांना व्हाईट हाऊसमध्ये प्रवेशापासून रोखू इच्छितो असे मत व्यक्त केले आहे भारतीय अमेरिकी चिकित्सक व कवी अमित मजुमदार यांनी राजकारणात डोनाल्ड ट्रम्प यांच्या अचानक उदयामुळे अनेक नागरिकांत भीतीची भावना आहे, असेही ते म्हणाले.
डबलिन येथे राहणारे रेडिओलॉजिस्ट अमित मजुमदार यांनी डेमोक्रॅटिकच्या इच्छुक उमेदवार हिलरी क्लिंटन आणि बर्नी सँडर्स यांच्यासमोर आपली भीती व्यक्त केली. मजुमदार हे डेमोक्रॅ टिकचे सदस्य असून हिलरी यांच्या बाबतीत त्यांचे सकारात्मक मत आहे. ओहोयो येथे आयोजित एका कार्यक्रमात मजुमदार म्हणाले की, आम्ही या महान देशात आतापर्यंतचा काळ चांगल्या प्रकारे व्यतीत केला आहे; पण ट्रम्प यांच्या उदयानंतर माझे कुटुंब अस्वस्थ आहे. खरे सांगायचे तर, भयभीत आहे.
हिलरी यांना त्यांनी प्रश्न विचारला की, जर ट्रम्प हे रिपब्लिकनचे उमेदवार झाले तर माझे एकच अभियान असेल ते म्हणजे व्हाईट हाऊसपासून त्यांना रोखणे. यावर बोलताना हिलरी म्हणाल्या की, आपण ट्रम्प यांना हरवू शकतो. कारण, आपल्याकडे आतापर्यंत प्रायमरीत ट्रम्प यांच्या तुलनेत सहा लाख मते अधिक आहेत.