ट्रम्प यांची विजयी घोडदौड सुरूच
By admin | Published: March 10, 2016 02:46 AM2016-03-10T02:46:34+5:302016-03-10T02:46:34+5:30
पक्षातूनच विरोध होत असतानाही डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी तीन प्राथमिक निवडणुकांत यश मिळवून विजयी घोडदौड सुरूच ठेवली आहे.
डेट्रॉईट : पक्षातूनच विरोध होत असतानाही डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी तीन प्राथमिक निवडणुकांत यश मिळवून विजयी घोडदौड सुरूच ठेवली आहे. दुसरीकडे हिलरी क्लिंटन यांना बर्नी सॅण्डर्स यांच्याकडून धक्का बसला. हे दोघे डेमोक्रॅटिकची उमेदवारी मिळावी यासाठी स्पर्धा करीत आहेत.
आपला विजय साजरा करताना ट्रम्प यांनी स्वपक्षीय अर्थात रिपब्लिकन नेत्यांवर टीका केली. ट्रम्प यांच्यावर हल्ले करण्यासह या नेत्यांनी त्यांची नकारात्मक प्रसिद्धी चालविली आहे. पक्षांतर्गत विरोध वाढला असूनही मिसिसीपीत ट्रम्प यांना रिपब्लिकन मतदारांची ५० टक्के मते मिळाली. दुसऱ्या स्थानावर सिनेटर टेड क्रुज राहिले. त्यांना ३५.२ टक्के रिपब्लिकन मतदारांनी पसंती दर्शविली. मिशिगनमध्ये ट्रम्प यांना ३७.२ टक्के मिळाली. क्लिंटन यांनी मिसिसीपीत शानदार विजय मिळवला. त्यामुळे सॅण्डर्स यांच्यापेक्षा त्यांच्याकडे अधिक प्रतिनिधी असतील. तथापि, मिशिगनमध्ये सॅण्डर्स यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. हिलरी यांना मिशिगनमध्ये सहज विजय मिळेल, अशी अपेक्षा होती. (वृत्तसंस्था)