उडणाऱ्या विमानाचे दार उघडण्याचा दारुड्याचा प्रयत्न
By admin | Published: March 10, 2016 02:48 AM2016-03-10T02:48:48+5:302016-03-10T02:48:48+5:30
विमान ३० हजार फूट उंचीवर असताना ब्रिटिश प्रवाशाने त्याचे दार उघडण्याचा प्रयत्न केल्यानंतर विमान तातडीने फ्रान्समधील विमानतळावर उतरविण्यात आले. ३० ते ३५ वयाचा हा प्रवासी दारूच्या नशेत होता.
लंडन : विमान ३० हजार फूट उंचीवर असताना ब्रिटिश प्रवाशाने त्याचे दार उघडण्याचा प्रयत्न केल्यानंतर विमान तातडीने फ्रान्समधील विमानतळावर उतरविण्यात आले. ३० ते ३५ वयाचा हा प्रवासी दारूच्या नशेत होता.
‘डेली मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार ईझी जेट कंपनीचे हे १८० प्रवाशांचे एअरबस ए ३२० विमान सोमवारी मार्केच (मोरोक्को) येथून लंडनच्या गेटविक येथे जात होते.
प्रवाशांनी सांगितले की, हा प्रवासी विमानात बसताच दारू पिवू लागला. विमानाचे उड्डाण होताच तो स्वत:ला आवरू शकला नाही व जागेवरून उठून तो दार उघडण्यासाठी निघाला. त्याच्या मैत्रिणीने त्याला अडवायचा प्रयत्न केल्यावर त्याने तिलाही ढकलून दिले.
ईझी जेटच्या प्रवक्त्याने हा प्रकार दुर्मिळ असून तो आम्ही गांभीर्याने घेतला आहे. या व्यक्तीवर आम्ही खटला चालवू, असे सांगितले. फ्रान्सचे पोलीसही या घटनेची चौकशी करीत आहेत.
———————