इंडोनेशियामध्ये 7.5 रिश्टर स्केलच्या भुकंपानंतर त्सुनामी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 08:25 PM2018-09-28T20:25:13+5:302018-09-28T20:26:00+5:30
जिओफिजिक्स खात्याचे प्रवक्त्याने त्सुनामी आल्याचे सांगितले.
जकार्ता : इंडोनेशियाच्या सुलावेसी बेटावर आज 7.5 रिश्टर स्केलचा भुकंपाचा धक्का बसल्यानंतर काही वेळाने त्सुनामीचाही जोरदार फटका बसला आहे. इंडोनेशियाच्या जिओफिजिक्स खात्याने याबाबत माहिती दिली आहे.
जिओफिजिक्स खात्याचे प्रवक्त्याने त्सुनामी आल्याचे सांगितले. त्याने सांगितले की 7.5 रिश्टर स्केलच्या भुकंपानंतर समुद्र किनाऱ्यांवर मोठ्या लाटा उसळल्या आहेत. मात्र, आम्ही याबाबत माहिती घेत आहोत. याबाबत पक्की खबर मिळताच अधिकृत घोषणा केली जाईल.
Major tsunami reported to have hit Palu, Indonesia after M 7.5 earthquake today, Sept 28! pic.twitter.com/01pQw4oNCB
— severe-weather.EU (@severeweatherEU) September 28, 2018
इंडोनेशियाच्या एका वृत्त वाहिनीने याबाबतचा एक व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला असून यामध्ये अजस्त्र लाट उसळल्याचे दिसत आहे. आणि तेथील लोक आरडाओरडा करत पळताना दिसत आहेत.
Omg there have earthquake and tsunami in palu Indonesia 😭😭 stay safe everyone #Prayfordonggala#Prayforpalupic.twitter.com/jUBqYJ2ajB
— StarMoonEXO ⭐🌙 (@StarMoonEXO) September 28, 2018
मध्ये सुलावेसीच्या डोंग्गाला भागात 10 किमीवर भुकंपाचा केंद्रबिंदू होता. यानंतर काही वेळाने पुन्हा सौम्य भुकंप आला. या भुकंपाची तिव्रता या वर्षीच्या सुरुवातीला आलेला लोमबोक बेटावरील आलेल्या भुकंपापेक्षा जास्त होती. या भुकंपामध्ये शेकडो लोक ठार झाले होते.